मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! अचानक तुटला Break dance Jhula, हवेत उडाले लोक; भयंकर दुर्घटनेचा VIDEO

Shocking! अचानक तुटला Break dance Jhula, हवेत उडाले लोक; भयंकर दुर्घटनेचा VIDEO

जत्रेत ब्रेक डान्स झुला वेगाने फिरत असताना अचानक घडली भयंकर दुर्घटना.

जत्रेत ब्रेक डान्स झुला वेगाने फिरत असताना अचानक घडली भयंकर दुर्घटना.

जत्रेत ब्रेक डान्स झुला वेगाने फिरत असताना अचानक घडली भयंकर दुर्घटना.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 10 ऑक्टोबर : झोपाळ्यावर बसायला कुणाला आवडत नाही. जत्रेत गेलात की वेगवेगळ्या प्रकारचे झुले पाहायला मिळतात. गरगर फिरणारे हे झुले पाहूनच चक्कर येते. अशाच गरगर फिरणाऱ्या झुल्यांपैकी एक म्हणजे ब्रेक डान्स झुला. एका जत्रेतील ब्रेक डान्स झुल्याच्या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडलेली ही दुर्घटना आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या घंटाघर रामलीला मैदानात जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री या जत्रेत ही दुर्घटना घडली. वेगाने फिरणारा ब्रेक डान्स झुला अचानक तुटला आणि त्यात बसलेले लोक हवेत उडाले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच धडकी भरेल.

हे वाचा - Shocking Video! विमानातून उडी मारताच फाटलं पॅराशूट; आकाशातून धडाधड जमिनीवर कोसळले जवान

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला सर्वकाही सुरळीत आहेत. लोक ब्रेक डान्स झुल्यात बसून आनंद लुटत आहेत, मजा करत आहेत. आता पुढे काहीतरी विपरित घडणार आहे हे कुणालाही वाटलं नव्हतं. आनंदाने ओरडत असताना अचानक ब्रेक डान्स झुल्याचा एक कप तुटतो. त्यावेळी एकच खळबळ उडाली. आनंदाने ओरडणारे सर्वजण किंचाळू लागतात. ब्रेक डान्स झुल्याचा कप तुटून जवळी लोखंडी रेलिंगवर आपटतो. त्यात बसलेले सर्वजण हवेत उडतात. तेसुद्धा त्या रेलिंगला धडकून जमिनीवर पडतात.

माहितीनुसार या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. यात तीन मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने कुणाला गंभीर दुखापत झालेली नाही.

हे वाचा - अवघ्या 11 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, 2 महिला जखमी, चंद्रपुरातील VIDEO

दरम्यान या दुर्घटनेनंतर गाझियाबाद प्रशासनाने तपासाचे आदेश दिले आहेत.या तपासानंतर आता कारवाई केली जाईल.

First published:

Tags: Uttar pradesh, Viral, Viral videos