अबुजा, 30 सप्टेंबर : विमानातून पॅराशूटमार्फत जमिनीवर उडी मारतानाचे पॅराजम्पचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पॅराजम्प फक्त पाहूनच आपल्याला धडकी भरते, ते प्रत्यक्षात करणाऱ्याची काय अवस्था असेल, असा विचारही आपल्या मनात येतो आणि पॅराजम्प करता करता पॅराशूट फाटलं तर… फक्त कल्पनेनेच घाम फुटला ना? पण काही जवानांवर अशी वेळ आली. विमानातून उडी मारताच पॅराशूट फाटलं आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. नायजेरियातील दुर्घटनेचा हा व्हिडीओ आहे. 1 ऑक्टोबरला नायजेरियाचा स्वातंत्र्य दिन आहे. राजधानी अबुजामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची तयारी सुरू आहे.. स्वातंत्र्यदिन म्हटला की जवानांच्या चित्तथरारक कसरती आल्याच. नायजेरितील जवान अशाच चित्तथरारक कसरतींचा सराव करत होते. जवानांची एक टिम पॅराजम्पचा सराव करत होती. काही जवानांनी विमानातून पॅराशूटमार्फत जमिनीच्या दिशेने उड्या मारल्या. पण जसे ते विमानातून बाहेर पडले, पॅराशूट उघढलं तेव्हा पॅराशूट फाटलेलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे वाचा - …जेव्हा Pm Narendra Modi यांच्या गाडीसमोर आली Ambulance; काय घडलं पाहा VIDEO या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता फाटलेल्या पॅराशूटसह जवान आकाशातून जमिनीच्या दिशेने येताना दिसत आहेत. पॅराशूट आधीपासूनच फाटलेले होते की उडी मारल्यानंतर फाटले याची अद्याप माहिती नाही. पण जवानांना समजलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. व्हिडीओ पाहूनच आपल्या काळजाचा ठोका चुकतो.
Nigerian paratroopers practicing for the Nigerian Independence Day celebrations in Abuja didn’t end very well. #Nigeria pic.twitter.com/hgndLCJvE0
— CNW (@ConflictsW) September 29, 2022
शेवटी जवान आकाशातून जमिनीवर येतात. धाडकन ते खाली कोसळतात. जिथं त्यांना लँड करायचं होतं, तिथं लँड करता आलं नाही. सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी पडले. कुणी झाडांवर, कुणी रस्त्याशेजारी पार्क केलेल्या गाड्यांवर, तर कुणी रस्त्यावर पडले. हे वाचा - बिल्डिंगवरून कोसळला चिमुकला, वाचवायला मागोमाग आईही गेली आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO त्यांचा जीव धोक्यात होता. तरी आपल्यामुळे कोणत्या नागरिकाला काही होऊ नये, याची काळजी ते घेत होते. या दुर्घटनेत काही जवान जखमीही झाले आहेत. सरकारने या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.