मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे बापरे! कोरोना लस घेतली आणि धाडकन जमिनीवरच कोसळला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

अरे बापरे! कोरोना लस घेतली आणि धाडकन जमिनीवरच कोसळला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

इंजेक्शन टोचताच ही व्यक्ती बेशुद्ध झाली.

इंजेक्शन टोचताच ही व्यक्ती बेशुद्ध झाली.

इंजेक्शन टोचताच ही व्यक्ती बेशुद्ध झाली.

ब्राझिलिया, 10 जून: कोरोना संसर्गावर (Coronavirus Infection) आळा घालण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरण  (Corona Vaccination) केलं जातं आहे. लस  (Corona Vaccine) घेतल्यानंतर काही लोकांना सौम्य अशा समस्याही (Corona vaccine side effect) जाणवत आहे. लस घेतलेल्या ठिकाणी दुखणं, तो भाग लाल होणं किंवा सौम्य ताप अशी लक्षणं लस घेतल्यानंतर दिसू लागतात. पण लस घेऊन घरी आल्यानंतर अशी लक्षणं दिसायला सुरुवात होतात. एक व्यक्ती मात्र कोरोना लस घेतल्या घेतल्याच तिथंच धाडकन जमिनीवर कोसळली.

कोरोना लस घेताच बेशुद्ध होणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral video) होतो आहे.  हा व्हिडीओ ब्राझीलच्या (Brazil)  एका व्यक्तीचा असून तो फेसबुकवर (Facebook) शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओत पाहू शकता तरुण इंजेक्शन टोचल्यानंतर जमिनीवर कोसळतो, तेव्हा सर्वजण घाबरतात. लसीकरण केंद्रावर असलेले सर्व लोक त्याच्याजवळ धावत येतात. त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तो तरुण आपले डोळे उघडतो, त्यानंतर त्याला पुन्हा तिथंच ठेवलं जातं. थोडा वेळ तरुण असाच जमिनीवर पडून राहतो. त्यानंतर तो स्वतःहून उठून बसतो. नंतर त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला धरून एका टेबलावर बसवतात.

हे वाचा - लहान मुलांना कधी मिळणार कोरोना लस? मोदी सरकारने जाहीर केला 'तो' दिवस

व्हिडीओ पाहून तुम्हाला सुरुवातीला धक्काच बसेल. तुम्ही म्हणाल हे नेमकं का झालं? हा कोरोना लशीचा दुष्परिणाम आहे का? तर असं काही नाही. जसं आपल्याला या व्हिडीओत दिसतं आहे, हा तरुण घाबरलेला आहे, त्याला भीती वाटते आहे आणि ही भीती म्हणजे इंजेक्शनची भीती आहे. हा तरुण इंजेक्शनला घाबरत होता. कित्येक लोक मोठे झाल्यानंतरही इंजेक्शनला घाबरतात. त्यांना इंजेक्शनची इतकी भीती वाटते की ते बेशुद्धही होतात. अशाच व्यक्तींपैकी ही एक व्यक्ती आहे. हा तरुण लस घेण्याच्या आधीपासूनच घाबरलेला दिसतो आहे. घाबरत घाबरतच तो लस घेतो आणि लस टोचताच लगेच जमिनीवर कोसळतो.

हे वाचा - नवरीला हवा Covishield Vaccinated नवरदेव, Viral जाहिरातीमागील काय आहे सत्य?

मॅगुइला ज्युनिअर असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यासोबत लसीकरण केंद्रावर असलेल्या त्याच्या मित्राने त्याचा हा व्हिडीओ आपल्या फोनवर शूट केला. त्यानंतर मॅगुइलाने स्वतः आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्ही बातमी जेव्हा सुरुवातीला वाचली असेल तेव्हा तुम्हाला काहीतरी गंभीर प्रकरण असल्याचं वाटलं असेल, पण सविस्तर बातमी वाचून आणि हा व्हिडीओ पाहून मात्र आता तुम्हाला हसू आवरत नसेल आणि तुमच्या ओळखीतील अशाच इंजेक्शनला घाबरणाऱ्या व्यक्तीचीही आठवण आली असेल. तर मग वाट कसली पाहताय, त्या व्यक्तीला लगेच ही बातमी शेअर करा.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus