• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • लहान मुलांना कधी मिळणार कोरोना लस? मोदी सरकारने जाहीर केला 'तो' दिवस

लहान मुलांना कधी मिळणार कोरोना लस? मोदी सरकारने जाहीर केला 'तो' दिवस

Children corona vaccination : लहान मुलांवर कोरोना लशीचं ट्रायल कधी पूर्ण होणार, त्याचा परिणाम कधी येणार आणि प्रत्यक्षात लस कधी मिळणार?

 • Share this:
  प्रिया गौतम/नवी दिल्ली, 10 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर (Corona second wave) नियंत्रण मिळवण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेला (Corona third wave) रोखण्यासाठी कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) वेग वाढवण्यात आला आहे. 18+ सर्व नागरिकांना कोरोना लस (Corona vaccine) दिली जाते आहे. तर आता 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांवर लवकरच कोरोना लसीकरणाचं (Children corona vaccination) ट्रायल सुरू होणार आहे. पण मग या मुलांना कोरोना लस (Kids corona vaccination)  कधी मिळणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? काही दिवसांतच लहान मुलांवरील कोरोना लसीकरणाचं ट्रायल (Corona vaccine trial on children) सुरू होणार आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचं मुलांवर ट्रायल केलं जाणार आहे. हे ट्रायल कधी संपणार, त्याचा रिझल्ट कधी येणार आणि मुलांना प्रत्यक्षात लस कधी मिळणार, असे एक ना दोन कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत. हे वाचा - लससाठ्याची माहिती सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका, केंद्रांचे राज्यांना आदेश इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार भारत बायोटेकमार्फत लहान मुलांवर कोवॅक्सिन लशीच्या ट्रायलची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयसीएमआरमधील ऑपरेशन ग्रुप फॉर कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितलं, हे ट्रायल पूर्ण व्हायलला जवळपास चार ते साडेचार महिने लागतील. चाचणीचा परिणाम ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत येण्याची आशा आहे. ट्रायलचे परिणाम आल्यानंतर काही दिवसांतच लहान मुलांचं लसीकरण सुरू केलं जाऊ शकतं. त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण नोव्हेंबर 2021 पर्यंत सुरू होण्याची आशा आहे. जर काही कारणामुळे यामध्ये उशीर झाला तर जानेवारी 2022 पासून लहान मुलांचं पूर्णपणे लसीकरण सुरू होईल. लशीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं संक्रमित लहान मुलांवर कोरोना लशीचं ट्रायल सुरू होण्याआधी एम्सने (AIIMS) धक्कादायक खुलासा केला आहे. 50% लहान मुलं संक्रमित असल्याचं एम्सच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. लशीच्या चाचणीसाठी ज्या लोकांना निवडण्यात येतं, त्यांची सुरुवातीला आरोग्य चाचणी केली जाते. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, की नाही याबद्दलची तपासणी केली जाते. शिवाय त्यांची कोरोना चाचणीही केली जाते. एम्समध्ये ज्या लहान मुलांवर लशीच्या ट्रायलआधी अशी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी बहुतेक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती स्क्रिनिंगमधून समोर आली. हे वाचा - मुलांवरील ट्रायलआधीच कोवॅक्सिनबाबत महत्त्वाची अपडेट; भारत बायोटेकची मोठी घोषणा टीवी 9 भारतवर्षने दिलेल्या माहितीनुसार, एम्स तर्फे देशातील 10 शहरांमध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं. या सर्वेक्षणातील रिपोर्टनुसार, देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच बरीच मुलं अशी होती ज्यांना कोरोना झाला होता मात्र, त्यांना त्याबद्दल माहिती नव्हती. या मुलांच्या पालकांनाही मुलांना कोरोना झाल्याची कल्पना नव्हती. या सर्व मुलांमध्ये मोठ्या लोकांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात संसर्ग, घशात संसर्ग यासारखी कोरोनाची गंभीर लक्षणं नव्हती. तर  केवळ सर्दी, खोकला आणि ताप आला होता, असंही या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. लहान मुलांसाठी 3 कोरोना लशी उपलब्ध लहान मुलांसाठी तीन कोरोना लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी भारतातच तयार करण्यात आलेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोना लशीचा समावेश आहे. या लशीच्या क्लिनिकल ट्रायलला DCGI ने काही दिवसांपूर्वीच परवानगी दिली आहे. याच महिन्यात हे ट्रायल सुरू होणार आहे. आठ आठवड्यात हे ट्रायल पूर्ण होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. दरम्यान भारतातील आणखी एका कंपनीने आपल्या कोरोना लशीसाठी आपात्कालीन परवानगी मागण्याच्या तयारीत आहे. गुजरातची   झायडस कंपनी DCGI कडे आपल्या लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज करणार आहे. जर मंजुरी मिळाली तर झायडूस 5 कोटी डोस देणार आहे. ते लहान मुलांसाठी वापरता येतील, असं झायडूसनं सांगितलं आहे. हे वाचा - लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्याची तयारी; चिमुकल्यांसाठी खास मेडिसीन किट तसंच लहान मुलांना परदेशी लस देण्याचीही सरकारने तयारी केली आहे. अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फाझर व्हॅक्सीन (Pfizer Vaccine) ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे. ज्यांची लस मुलांनाही दिली जात आहे. आता ही लस भारतातील मुलांनाही दिली जाणार असल्याचे, दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. फायझरची लस लवकरच भारतात उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: