मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कसं शक्य आहे? मगरीच्या जबड्यात जाऊनही तो जसाच्या तसा जिवंत बाहेर आला; Shocking Video

कसं शक्य आहे? मगरीच्या जबड्यात जाऊनही तो जसाच्या तसा जिवंत बाहेर आला; Shocking Video

सिंह, बिबट्यासारख्या शक्तिशाली प्राण्याचीही शिकार करणारी मगर साध्या जीवाची शिकार करू शकली नाही.

सिंह, बिबट्यासारख्या शक्तिशाली प्राण्याचीही शिकार करणारी मगर साध्या जीवाची शिकार करू शकली नाही.

सिंह, बिबट्यासारख्या शक्तिशाली प्राण्याचीही शिकार करणारी मगर साध्या जीवाची शिकार करू शकली नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 03 ऑक्टोबर : मगरीच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मगरीच्या जबड्यात एकदा कुणी गेलं की त्याची सुटका अशक्यच. अगदी सिंह, बिबट्या अशा बलाढ्य, शक्तिशाली प्राण्यांचाही मगरीसमोर टिकाव लागत नाही. काही क्षणातच मगर अशा प्राण्यांनाही गिळंकृत करून टाकते. त्यामुळे मगरीच्या तावडीतून कुणी वाचलं, किंबहुना मगरीच्या जबड्यातून कुणी जसंच्या तसं जिवंत बाहेर आलं असं सांगितलं तर साहजिकच कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एका साधा जीव खतरनाक मगरीच्या तावडीतून सुटला आहे. मगरीचा शिकार होता होता तो बचावला आहे. अगदी मगरीने या जीवाला आपल्या जबड्यात धरलं. त्याला चावलंही पण तरी त्याला ती गिळू शकली नाही. तोंडात घास असूनही मगर तो पोटात ढकलू शकत नव्हती. अशी अवस्था मगरीची झाली. आता हा जीव नेमका कोण हे पाहण्याचीही तुम्हाला उत्सुकता असेल.

हे वाचा - 'एक शिकार दोन शिकारी' नक्की कोणाच्या हाती लागणार हरिण? पाहा Video

तर हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नाही तर चक्क कासव आहे. जो कासव गोष्टीत सशाबरोबर साधी धावण्याची शर्यत हरला तो खऱ्या आयुष्यात मात्र मगरीसोबत आयुष्याची लढाई जिंकला.

व्हिडीओत पाहू शकता एका मोकळ्या मैदानात एक मगर दिसते. तिथंच एक कासव देतो.  तो कासव त्या मगरीजवळ पोहोचतो आणि थांबतो. त्याच क्षणी मगर संधी साधते आणि कासवावर हल्ला करते. कासवाला ती आपल्या जबड्यात धरते. जबड्यात धरून तो कासवाचे तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न करते. पण मगरीला काही ते शक्य होत नाही.

" isDesktop="true" id="769097" >

याचं कारण म्हणजे कासवाची मजबूत पाठ. कासवाच्या पाठीला मगरीला चावता येत नसतं. मगर जेव्हा त्याला चावण्याचा प्रयत्न करते तेव्हा कासव मगरीच्या जबड्यात उडत राहतं आणि उडता उडता ते बाहेर पडतं. त्यानंतर ते गप्पपणे तिथून निघून जातं. बिच्चारी मगर मात्र तिथंच राहते. तोंडाशी आलेला घास तिच्या डोळ्यासमोरून निघून जातो आणि ती गप्पपणे पाहत राहते.

होम शार्क टीवी (Home Shark TV) यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal