नवी दिल्ली 16 जून : हत्ती हा असा प्राणी आहे, ज्याला लोक अनेकदा गोंडस आणि पाळीव प्राणी समजतात. कार्टूनमध्ये हत्ती गोंडस आणि गोड स्वभावाचे दाखवले जात असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांचा राग सहन करण्याची हिंमत कोणाचीच नाही. हत्ती जेव्हा संतापतात तेव्हा ते जंगलाचा राजा सिंहाशी लढायलाही तयार होतात, मग माणूस तर त्यांच्यासमोर काहीच नाही. असे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत असतात, ज्यामध्ये हत्तीचं भयानक रूप पाहायला मिळतं. आ ‘भैंस’ मुझे मार! तरुणाने म्हशीला चिथवलं; पुढे जे घडलं ते भयंकर; Shocking Video Viral सध्याचा हत्तीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही लोक नदीत अंघोळ करत आहेत. पण तिथे चवताळलेला हत्ती अचानक येईल, याची त्यांची अजिबात कल्पना नव्हती. लोकांना नदीत आंघोळ करताना पाहून हत्ती लगेच जोरात ओरडू लागतो आणि त्यांचा पाठलाग करू लागतो. हत्तीचा आवाज ऐकून नदीत आंघोळ करणाऱ्या लोकांचाच थरकाप उडतो ते तिथून पळू लागतात. लोक निघून गेल्यावर हत्तीही शांत होतो.
नदी में नहा रहे लोगों को
— The Himalyan Club 🇮🇳 (@HimalyanClub) June 14, 2023
हाथी ने दौड़ा दौड़ा कर भगाया 🦣
कोटद्वार कें सिद्धबली मंदिर कें पास खोह नदी में नहा रहें लोगों की जान पर उस समय बन आई ज़ब टस्कर हाथी नें उन्हें नदी सें दौड़ा दिया.
📍#kotdwar #Uttarakhand #India 🇮🇳 #TheHimalyanClub pic.twitter.com/rjMKDJ3sbz
ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, तो नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणांना फटकारतानाही दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तराखंडचा आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या युजरने सांगितलं की, हे लोक कोटद्वारच्या सिद्धबली मंदिराजवळ असलेल्या खोह नदीत आंघोळीसाठी आले होते. त्यानंतर हत्तीने तरुणांना पळवून लावले. हत्तीने माणसांना पळवून लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, तामिळनाडूमधून एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये हत्तीने आपल्या हद्दीत घुसलेल्या एका व्यक्तीचा पाठलाग केला होता. तसं, हत्ती खूप मैत्रीपूर्ण आणि गोंडस प्राणी आहेत. मात्र जेव्हा कोणी त्यांच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांची सुरक्षा धोक्यात आणतो तेव्हा ते खूप आक्रमक होतात.