नवी दिल्ली 19 मार्च : देशभरात शुक्रवारी अतिशय उत्साहात होळीचा सण साजरा केला गेला. होळीच्या (Holi 2022) दिवशी संपूर्ण देश रंगात रंगल्याचं पाहायला मिळालं. यादिवशी लोक भरपूर मस्ती करतात. एकमेकांना रंग लावत लोक हा सण खास अंदाजात साजरा करतात. हा सण लोकांना विशेष आवडतो, याच कारणामुळे वर्षभर अनेकजण या सणाची वाट बघत राहतात.
Shocking video! पेटत्या होळीत व्यक्तीने मारली उडी, पुढच्याच क्षणी झाला चमत्कार
सध्या होळीचा एक प्रँक व्हिडिओ (Funny Prank Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणींवर रंग फेकण्याचा प्रँक करताना दिसतात. यादरम्यान ते या तरुणींची प्रतिक्रिया रेकॉर्ड करतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही मुलं होळीच्या दिवशी रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांसोबत प्रँक करण्याचा प्लॅन बनवतात.
यानंतर हे तरुण हातात बादली घेऊन रस्त्यावरुन जाणाऱ्या मुलींच्या अंगावर बादलीतील रंग फेकण्याचं नाटक करतात. यादरम्यान तरुणींनाही असं वाटतं की बादलीत भरलेला रंग हे तरुण आपल्या अंगावर टाकणार आहेत. रंगापासून वाचण्यासाठी त्या धावू लागतात. या व्हिडिओमध्ये फक्त रिकामी बादली घेऊन हे तरुण अनेकांसोबत प्रँक करताना दिसतात. यावर नेटकऱ्यांनीही अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
VIDEO - सासू-सुनेत भांड्यांवरून राडा; संतप्त सासूबाईने हातात चाकू घेतला आणि...
व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की होळीचा असा प्रँक व्हिडिओ कधीही पाहिला नाही. व्हायरल होणारा व्हिडिओ थोडा जुना आहे, मात्र होळीच्या वेळी आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. Prank Buzz नावाच्या यूट्यूब अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओ 60 लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Holi 2021