क्वालालांपूर, 18 मार्च : सासू-सुनेचं भांडण तसं काही नवं नाही. काही लोकांनी आपल्या घरात प्रत्यक्षात हे पाहिलं असेल तर काहींनी सीरिअल्समध्ये. पण हे फक्त भारतात होऊ शकतं, असं अनेकांना वाटतं पण आता परदेशातील सासू-सुनेच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासू-सुनेत जबरदस्त राडा झालेला पाहायला मिळतो आहे. एका छोट्याशा कारणावरून सासू-सुनेत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला सासूने चक्क हातात चाकू घेतला आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सासू सुनेवर भयंकर संतप्त झालेली दिसते आहे. त्यांच्या भांडणाचं कारण आहे ते भांडी. फक्त भांडी घासण्यावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि या भांडणाने उग्र रूप धारण केलं. हे वाचा - लवकरच असं काम करणार नवरा की खूश झाली बायको; गिफ्ट केली 5 कोटींची लक्झरी कार व्हिडीओत पाहू शकता सासू-सुनेत जबरदस्त भांडणं सुरू आहेत. त्यांच्यातील वाद इतका वाढतो की सासू आपल्या सुनेला घरातून बाहेर पडायला सांगते. त्यानंतर ती तिचं सर्व सामानही बाहेर फेकून देते. इतकंच नव्हे तर चाकू हातात घेऊन तिला घरात येऊ नये अशी वॉर्निंगही देते.
दोघंही मोठमोठ्या किंचाळत, भांडत होत्या. त्यांच्या राड्यामुळे मुलंही रडत होती पण दोघांची लढाई काय थांबली नाही. अखेर एक महिला आली आणि ती सासूला घरात घेऊन गेली. सासूला समजावून ती प्रकरण शांत कऱण्याचा प्रयत्न करत होती. अखेर सासूला कारमध्ये बसवून घरातून बाहेर नेण्यात आलं. हे वाचा - विद्यार्थिनीच्या बाळासोबत प्रोफेसरचं वागणं पाहून वाटेल आश्चर्य, VIDEO मलेशियन फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सुनेनं आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्याची माहिती मिळते आहे. स्थानिक मीडिया Noodou च्या रिपोर्टनुसार ही घटना 17 मार्चची आहे.