मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चष्म्याने उलगडा सर्वात मोठा 'राज', गर्लफ्रेंडसमोर चीटर बॉयफ्रेंडची पोलखोल

चष्म्याने उलगडा सर्वात मोठा 'राज', गर्लफ्रेंडसमोर चीटर बॉयफ्रेंडची पोलखोल

तरुणीने बॉयफ्रेंडच्या फोटोतील चष्म्यात पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

तरुणीने बॉयफ्रेंडच्या फोटोतील चष्म्यात पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

तरुणीने बॉयफ्रेंडच्या फोटोतील चष्म्यात पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 26 डिसेंबर :  काही कपल (Couple) एकमेकांना चीट करत (Partner cheating) असतात. आपल्या जोडीदाराशिवाय दुसऱ्या कुणासोबत तरी त्यांचं रिलेशन असतं. किती तरी वेळा ते पार्टनरच्या समोर येत नाही. पण कधी ना कधी त्यांची चोरी पकडली जातेच. एका गर्लफ्रेंडने आपल्या चीटर बॉयफ्रेंडचीही अशीच चोरी पकडली. त्याच्या चष्म्याने त्याची पोलखोल केली. यूकेतील या तरुणीने आपल्या लव्ह आणि ब्रेकअपची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे.  तिने सांगितलं, ती एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. तिच्या बॉयफ्रेंडने तिला एक दिवस आपला सेल्फी फोटो पाठवला. तो फॅमिली ट्रिपवर गेल्याचं त्याने सांगितलं. तरुण आपल्या कुटुंबासोबत म्हणून सहलीला गेला होता. पण त्याने पाठवलेला सेल्फी जेव्हा गर्लफ्रेंडने पाहिला तेव्हा तिला धक्का बसला. तरुणीने तो फोटो नीट पाहिला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या बॉयफ्रेंडने कलरफुल चष्मा घातला होता आणि पाण्यात एका छोट्याशा बोटीत तो बसला होता. त्याच्या चष्मावर रिफ्लेक्शन पडत होतं. त्यात दिसत होतं ही तो पाण्यात चालण्यावर स्कूटवर बसला होता आणि ती स्कूटर एक मुलगी चालवत होती. आपला बॉयफ्रेंड कुटुंबासोबत नाही तर दुसऱ्या मुलींसोबत ट्रिपला गेला होता हे तिला समजलं. हे वाचा - Dating वर जाण्यापूर्वी नाव केलं Google, सत्य वाचून सरकली पायाखालची जमीन द सनच्या रिपोर्टनुसार यानंतर ती संतप्त झाली तिने आपल्या बॉयफ्रेंडला मेसेज केला. त्याच्यावर आपल्याला फसवल्याचा आरोप लावला. बॉयफ्रेंडची पोलखोल होताच त्यानेही आपण दुसऱ्या मुलीसोबत होतो याची कबुलीही दिली. त्यानंतर तरुणीने त्याला ब्लॉक केलं, त्याच्याशी संपर्क तोडला आणि त्याच्यासोबत ब्रेकअपही केलं.
First published:

Tags: Breakup, Couple, Lifestyle, Relationship

पुढील बातम्या