मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Dating वर जाण्यापूर्वी नाव केलं Google, सत्य वाचून सरकली पायाखालची जमीन

Dating वर जाण्यापूर्वी नाव केलं Google, सत्य वाचून सरकली पायाखालची जमीन

महिला ज्याच्यासोबत डेटिंगवर जाणार होती, त्याच्याबाबत भेटीपूर्वी काही वेळ अगोदर तिला सत्य माहिती समजली आणि तिला चांगलाच धक्का बसला.

महिला ज्याच्यासोबत डेटिंगवर जाणार होती, त्याच्याबाबत भेटीपूर्वी काही वेळ अगोदर तिला सत्य माहिती समजली आणि तिला चांगलाच धक्का बसला.

महिला ज्याच्यासोबत डेटिंगवर जाणार होती, त्याच्याबाबत भेटीपूर्वी काही वेळ अगोदर तिला सत्य माहिती समजली आणि तिला चांगलाच धक्का बसला.

  • Published by:  desk news
न्यूयॉर्क, 25 डिसेंबर: ज्या व्यक्तीसोबत डेटिंग जाण्याचा (Dating plan) प्लॅन ठरला होता, त्याच्यासोबत डेटिंगसाठी निघण्यापूर्वी उत्कंठेपोटी तिनं त्याचं नाव गुगल ( Google name) केलं. त्यात जे तपशील (Details) तिला मिळाले, ते वाचून ते फक्त वेडीच व्हायची बाकी होती. सध्या ऑनलाईन डेटिंग ऍपच्या (Online dating app) माध्यमातून एकमेकांची ओळख करून घेणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष भेटण्याचा ट्रेंड आहे. मात्र या प्रकारात अनेकदा तरुण आणि तरुणींची फसवणूक होत असते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती ऑनलाईन डेटिंग ऍपचा वापर करून इतरांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा सतत प्रयत्न करत असतात. त्यातून प्रत्यक्ष भेट घडवून आणायची, ओळख वाढवायची आणि गुन्हेगारी कृत्य करून आपला डाव साधायचा, असा हेतू असल्याचे अनेक गुन्हे आतापर्यंत समोर आले आहेत. नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगात महिलेची अशीच फसवणूक होण्याची शक्यता होती, मात्र योगायोगाने ती टळली. तरुणीने शोधले नाव अमेरिकेतील नॅशविले भागात राहणाऱ्या शायनानं ऑनलाईन डेटिंगवर ओळख झालेल्या एका तरुणासोबत भेट निश्चित केली होती. तिने एका व्हिडिओतून आपला अनुभव शेअर केला आहे. त्यात तिने दिलेल्या माहितीनुसार तिची ज्या व्यक्तीसोबत डेट ठरली होती, त्याचे नाव तिने सहज गुगल केले आणि तिला जबर धक्का बसला. हे वाचा - मृत्यूनंतर 29 वर्षांनी मायलेकीला मिळाला न्याय; HCने पतीला सुनावली मोठी शिक्षा तरुण होता गुन्हेगार तरुणीने ज्या व्यक्तीसोबत डेट निश्चित केली, तो एक सराईत गुन्हेगार असून अपहरणाच्या गुन्ह्यात त्याला शिक्षादेखील झाल्याचं तिला समजलं. ‘द सन’नं दिलेल्या बातमीनुसार महिलेनं याबाबतचा आपला अनुभव टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. कुठल्याही महिलेनं आपल्या पार्टनरची पूर्ण माहिती मिळवल्याशिवाय त्याच्यासोबत डेटवर जाऊ नये, असा सल्ला महिलेनं दिला आहे.
First published:

Tags: Dating app, Kidnapping, Online dating

पुढील बातम्या