मुंबई, 14 जुलै : मागच्या काही दिवसात पावसामुळे भारतातील विविध भागात पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. हिमाचल, दिल्ली सारख्या ठिकाणची तर फारच भयानक अवस्था झाली आहे. यासंबंधीत अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. पावसाळ्यात किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाताना लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेक घरांचे, गाड्यांचे नुसकान होते. रस्त्यावर अडकलेले लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याच्या प्रयत्नात असतात. या दरम्यान कधी मजेशीर गोष्टी घडतात तर कधी धक्कादायक प्रकरण देखील समोर येतात. सध्या एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. ‘पापा की परी’ विसरा, आता ‘पापा का परा’ आला ट्रेंडमध्ये; सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहिलात का? या व्हिडीओत एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला साचलेल्या पाण्याता पाडलं, ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नेटकरी कमेंटमध्ये देखील असाच प्रश्न उपस्थीत करत आहेत. खरंतर हा व्हिडिओ खूप जुना आहे, मात्र पावसाळ्यात तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. एक तरुण पाणी साचलेल्या रस्त्यावरून स्कूटर ढकलताना दिसत आहे, तर एक मुलगी स्कुटीवर मागच्या सीटवर बसूनच राहिली आहे आणि आनंद घेत आहे. तिला साचलेल्या पाण्यात पाय ठेवायचं नव्हतं ज्यामुळे ती पाय वर करुन बसली होती. परंतू अखेर असं काही तरी घडलं की बॉयफ्रेंडनं गाडी थेट पाण्यात सोडून दिली, ज्यामुळे गर्लफ्रेंड केसापासून ते पायाच्या नखापर्यंत पूर्णपणे साचलेल्या पाण्यात भिजली. Viral Video : कारला धडक आणि महिला रस्त्यावरुन गायब, अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असं दिसत आहे की पाण्यात त्या तरुणाला गाडी सावरता येत नाही, जेव्हा मागून काही गाड्या जाताता तेव्हा पाण्याची जोरात हालचाल होते, ज्यामुळे त्याच्या हातातून गाडी सुटली आणि स्कुटीसकट तरुणी पाण्यात पडली. मुख्य म्हणजे ही तरुणी जिथे पडली तिथून कार जात होती. नशिबाने ही कार थांबली ज्यामुळे खुप मोठा अनर्थ टळला.
हा व्हिडीओ @HasnaZarooriHai नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. काहींनी चिंता व्यक्त केली आहे तर काहींनी या व्हिडीओला मजेदार पद्धतीनं घेतलं आहे.