बिजिंग, 22मे : चिन्यांच्या अजब देशता काय होईल हे सांगता येत नाही. एक तरुणीला बॉयफ्रेंडने धोका दिला म्हणून तिने बदला घेण्यासाठी त्याच्या घरी एक टन कांदे ओतले. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेचं नाव झाओ असं असून बॉयफ्रेंडनं तिला धोका दिला होता. एक वर्षांहून अधिक काळ दोघं रिलेशनमध्ये होते. त्यानंतर बॉयफ्रेंडनं धोका दिला असा आरोप तरुणीने केला आहे.
रागाच्या भरात झाओने बॉयफ्रेंडच्या घरी एक टन कांदे पाठवण्याचा निर्णय घेतला. तिने डिलिव्हरी करणाऱ्यालासुद्धा असं सांगितलं की त्याला न सांगता दारात कांदे ओतून ये. या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. बॉयफ्रेंडच्या दारात कांद्याची अनेक पोती पडली होती.
Ladbible ने दिलेल्या वृत्तानुसार कांद्यासोबत झाओनं एक चिठ्ठीही पाठवली होती. त्यात म्हटलं की, मी तीन दिवस रडले आता तुझी वेळ आली. दरम्यान, झाओच्या बॉयफ्रेंडला मात्र दारात हे सगळं पाहुन धक्काच बसला. फोटोमध्ये तो कांद्यांच्या पोत्यांकडे बघत असलेला दिसतो. बॉयफ्रेंडने Shandong Net ला सांगितलं की गर्लफ्रेंडच्या वाढलेल्या नाटकांमुळे त्यानं ब्रेकअप केला.
पाहा VIDEO : लॉकडाऊनमध्ये जेवणावरून पत्नीशी भाडणं, पतीनं बिल्डिंगवरून मारली उडी
तो म्हणाला की, झाओ खूपच ड्रामेबाज होती. ती सर्वांना सांगायची की ब्रेकअपनंतर मला एकदाही रडू आलं नाही. मी इतका वाईट आहे की मी रडलो नाही? झाओने पाठवलेल्या कांद्यांमुळे तिच्या बॉयफ्रेंडच्या शेजाऱ्यांचे मात्र वांदे झालेत. कारण सर्व कांदे त्यानं बाहेर कंपाउंडमध्येच ठेवले आहेत.
हे वाचा : उंदरांच्या बिळात पाणी सोडलं आणि वेगवेगळ्या जातीचे 200 साप आले बाहेर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.