अहमदाबाद, 19 मे : कोरोनाला रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. याकाळात घरातच लोक अडकून पडले आहेत. मिळालेल्या वेळेत लोक काहीतरी नवीन शिकत आहेत. घरच्या लोकांसोबत वेळ घालवत आहेत. दरम्यान, अहमदाबादमध्ये पत्नीसोबत जेवणावरून झालेल्या भांडणात पतीनं चक्क आत्महत्येचाच प्रयत्न केला. सुदैवानं यात तो बचावला. अहमदाबादमधील चांदखेडा इथं राहणाऱ्या एका व्यक्तीचं त्याच्या पत्नीशी भाजीवरून भांडण झालं. दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला. त्यानंतर पती थेट बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकायला लागला. तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. पती बाल्कनीला लटकत असल्याचं शेजारच्या लोकांना दिसलं. लोक तिथं आले आणि त्यांनी पतीची समजूत काढली. त्याला असं करू नको म्हणत वरती ओढून घेतलं आणि जीव वाचवला.
काही लोकांना यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. कोरोनाने आधीच हाल केले आहेत. त्यात हे असे भांडण झाल्यावर टोकाचा निर्णय कशासाठी? कोरोनाच्या या संकटात कोणी इतकं मानसिक संतुलन बिघडवतं का? तर काहींनी ही व्यक्ती तारक मेहता आहे का असाही प्रश्न विचारला आहे. हे वाचा : कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांनी केला अजब जुगाड, पाहा PHOTO