जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजबच आहे! फिल्म सुरू होण्याआधी Girlfriend ने संपवला स्नॅक्स; Boyfriend ने लगेच केला ब्रेकअप

अजबच आहे! फिल्म सुरू होण्याआधी Girlfriend ने संपवला स्नॅक्स; Boyfriend ने लगेच केला ब्रेकअप

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Pixabay)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Pixabay)

ब्रेकअपला कारण ठरलं एक स्नॅक्स.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 मार्च : नवरा-बायको असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड (Girlfriend boyfriend) अगदी छोट्या छोट्या कारणांवरूनही त्यांच्यामध्ये भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की अगदी घटस्फोट, ब्रेकअपपर्यंत (Breakup) पोहोचतात. पण सध्या एका कपलच्या ब्रेकअपचं असं कारण चर्चेत आलं आहे, जे ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. या कपलच्या ब्रेकअपचं कारण ठरलं ते एक स्नॅक्स. फिल्म पाहण्यासाठी गेलेल्या या कपलचा ब्रेकअप एका स्नॅक्सवरून झाला आहे. गर्लफ्रेंडने फिल्म सुरू होण्याआधीच स्नॅक्स संपवले म्हणून बॉयफ्रेंड इतका संतप्त झाला की त्याने थेट ब्रेकअपसारखा टोकाचाच निर्णय घेतला. महिलेने आपल्या रिलेशनशिपमधील विचित्र अनुभव शेअर केला आहे. महिलेनें सांगितलं, त्या रात्री ती फिल्ममध्ये पाहण्यासाठी आपल्या डेटसोबत गेली. तिच्या बॉयफ्रेंडने पॉपकॉर्न घेतले तर तिने आपल्यासाठी चॉकलेट्सचं मोठं पाकीट घेतलं. हे वाचा -  BF ने मोठ्या प्रेमाने खायला घातलं चिकन; आत जे दिसलं ते पाहूनच हादरली तरुणी थिएटरमध्ये सीट्सवर बसताच तिने चॉकलेट खायला सुरुवात केली. फिल्म सुरू होण्याआधीच तिने खायला सुरुवात केली म्हणून तिचा बॉयफ्रेंड तिला आधी ओरडला पण तरी ती ऐकली नाही. त्यामुळे जेव्हा फिल्म सुरू झाली तेव्हा 10 मिनिटांच्या आतच तिचं चॉकलेटचं पाकीट संपलं. तेव्हा तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. तो फक्त फिल्म कधी संपेल याची प्रतीक्षा करू लागला. धक्कादायक म्हणजे फिल्म संपताच त्याने आपलं नातंही संपवलं. महिलेने आपला हा अनुभव शेअर करत लोकांकडे सल्ला मागितला आहे. महिलेचा अनुभव ऐकल्यानंतर बहुतेक युझर्सनी महिलेला जे झालं ते चांगलंच झालं, असं म्हटलं आहे. फिल्म सुरू होण्याआधी स्नॅक्स खाल्ले म्हणून ब्रेकअप केलं असेल तर याचा अर्थ तो आधीपासूनच तुला सोडण्याच्या तयारीत होता, याबाबत तू आनंद व्यक्त करायला हवा, असं नेटिझन्स म्हणाले. हे वाचा -  अजबच! खेळण्यातील विमानाच्या प्रेमात पडलीये 28 वर्षीय तरुणी; असा करते रोमान्स ब्रेकअपचं हे कारण तुम्हाला कितपत पटतं आहे, हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात