जाहिरात
मराठी बातम्या / Viral / BF ने मोठ्या प्रेमाने खायला घातलं KFC CHICKEN; चिकनच्या आत जे दिसलं ते पाहूनच तरुणी हादरली

BF ने मोठ्या प्रेमाने खायला घातलं KFC CHICKEN; चिकनच्या आत जे दिसलं ते पाहूनच तरुणी हादरली

BF ने मोठ्या प्रेमाने खायला घातलं KFC CHICKEN; चिकनच्या आत जे दिसलं ते पाहूनच तरुणी हादरली

KFC रेस्टॉरंटमध्ये कपलने जे पाहिलं ते आयुष्यात कधीच विसरणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 07 मार्च :  तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसोबत किंवा बॉयफ्रेंडसोबत लंच किंवा डिनरला गेला असाल. तिथं तुम्हाला तुमच्या पार्टनरने प्रेमाने काही पदार्थ खायला घातले. पण त्या पदार्थात असं काही दिसलं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. असंच काहीसं घडलं ते ब्रिटनमधील एका महिलेसोबत. जिच्या बॉयफ्रेंडने तिला इतक्या प्रेमाने केएफएसी  (KFC)  रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी नेलं. पण तिथं जे घडलं ते हे कपल आयुष्यात कधीच विसरणार नाही. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार वेल्समध्ये राहणारी जॉडी बिशोप (Jody Bishop) आपल्या बॉयफ्रेंडसोबत  Ebbw Vale  केएफसी रेस्टॉरंटमध्ये गेली. वेल्स ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार कपलने एक मील घेतलं, ज्यात दोन पीस ओरिजनल रेसिपी चिकन, दोन हॉट विंग्स आणि दोन फिलेट होते. दोघंही मस्त चव घेत आनंदात खात होते. अचानक त्यांना ते खात असलेल्या खाद्यपदार्थात काहीतरी हलताना दिसलं (Woman found moving insect in KFC chicken). हे वाचा -  म्हणे, ‘देवाची इच्छा पूर्ण करतोय’; 16 मुलांचे आईबाबा करतायेत 17व्या बाळाची तयारी जॉडीने सांगितलं ती खाणं सोडून आपल्यासाठी ड्रिंक आणायला गेली. जेव्हा ती ड्रिंक घेऊन परतली तेव्हा तिला तिच्या हॉट विंग्सच्या वर छोटा किडा दिसला. जसं काही तो डान्स करत होता. ड्रिंकला जाण्याआधी तिने तोच पीस खाल्ला होता आणि तो अर्धवट तसाच राहिला होता. त्यामुळे त्याच पीसमध्ये किड्याला पाहताच तिला धक्काच बसला, उलटीसारखं वाटू लागलं. ती लगेच बाथरूममध्ये गेली आणि तिने उलटी केली. त्यानंतर तिला आजारी असल्यासारखं वाटू लागलं.

जॉडीने हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे.  कपलने सांगितलं की तो एक कॅटरपिलर होता. केएफएसीसारख्या ब्रँडच्या खण्यात असा जिवंत किडा सापडू शकतो, यावर दोघांनाही विश्वास बसत नव्हता. हे वाचा -  चाऱ्यासह जिराफाने मुलालाही जबड्यात पकडून वरती ओढलं अन्…; थरकाप उडवणारा VIDEO कपलला खाण्याचे पैसे तर परत मिळाले पण ते समाधानी नव्हते. रेस्टॉरंट आपल्या ग्राहकांना असे पदार्थ कसे काय खायला घालू शकतात, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.  केएफसी अशा कारणामुळे वादात आल्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात