जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गर्लफ्रेंडने दिलं असं गिफ्ट की पालटलं बॉयफ्रेंडचं नशीब; तुम्हीही म्हणाल, 'GF असावी तर अशी'

गर्लफ्रेंडने दिलं असं गिफ्ट की पालटलं बॉयफ्रेंडचं नशीब; तुम्हीही म्हणाल, 'GF असावी तर अशी'

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

गर्लफ्रेंडने दिलेल्या गिफ्टमुळे बॉयफ्रेंडचं नशीब फळफळलं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 24 फेब्रुवारी : बरेच कपल एकमेकांना गिफ्ट देतात. तुम्हीही तुमच्या बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला गिफ्ट दिलं असेल किंवा तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून गिफ्ट मिळालं असेल. जोडीदाराकडून गिफ्ट मिळाल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. पण असंच जोडीदाराने दिलेल्या गिफ्टमुळे एका तरुणाचं नशीब पालटलं आहे. गर्लफ्रेंडने दिलेल्या गिफ्टमुळे बॉयफ्रेंडचं नशीब फळफळलं आहे. बिहारच्या समस्तीपूरमधील 21 वर्षांचा अमरजीत जयकर जो  सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोनू सूदनेही त्याचं कौतुक केलं. त्याला मुंबईतूनही चांगली ऑफर मिळाली आहे. आपल्या या यशाचं क्रेडिट तो आपल्या गर्लफ्रेंडला देतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. बऱ्याच फिल्ममध्येही जोडीदार कसा जोडीदाराच्या यशाचा मार्ग ठरला ते दाखवलं जातं. प्रत्यक्षातही अशा काही स्टोरी आहेत, त्यापैकीच एक स्टोरी अमरजीतची. जो गर्लफ्रेंडच्या गिफ्टमुळे सुपरस्टार झाला आहे. त्याची गर्लफ्रेंड त्याला फेसबुकवर भेटली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. VIDEO - झोप येईना म्हणून इन्स्टाग्राम पाहिलं; मध्यरात्री लाइव्ह दिसला त्याच्याशीच केलं लग्न अमरजीत म्हणाला, डिप्रेशनवेळी माझ्या गर्लफ्रेंडनं मला खूप आधार दिला. जेव्हा मी काहीच नव्हतो तेव्हा मला गर्लफ्रेंडने स्टँड, गिटार दिलं होतं. व्हिडीओ बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं. व्हिडीओ बनव आणि अपलोड कर, असं तिनं मला ओरडून  सांगितलं. तिने दिलेल्या गिटारवर मी प्रॅक्टिस करायचो. आता सर्वकाही ठिक झालं. माझी प्रगती पाहून तीसुद्धा आनंदी आहे. आता बीएसच्या प्रथम वर्षात असलेल्या अमरजीला सिंगर बनायचं आहे.आता तो स्टेज शो करत आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत अमरजीत म्हणाला, सुरुवातीला तो बड्या घरांमधील फंक्शनमध्ये गायचा. तिथूनच त्याच्या गायनाची सुरुवात झाली. तेव्हा तो वेटरची नोकरी करत होता. तिथं त्याला 200-50 रुपये मिळायचे. आता आवाजाच्या जोरावर काहीतरी करायचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात