मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - थेट म्हशीलाच उचलायला गेला पण...; स्वतःला बाहुबली समजणाऱ्या तरुणाची झाली चांगलीच फजिती

VIDEO - थेट म्हशीलाच उचलायला गेला पण...; स्वतःला बाहुबली समजणाऱ्या तरुणाची झाली चांगलीच फजिती

आपली ताकद दाखवण्याच्या नादात तरुणाने आपलं हसू करून घेतलं आहे.

आपली ताकद दाखवण्याच्या नादात तरुणाने आपलं हसू करून घेतलं आहे.

आपली ताकद दाखवण्याच्या नादात तरुणाने आपलं हसू करून घेतलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 09 ऑगस्ट : प्रत्येक जण आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषतः बहुतेक पुरुषांना आपल्या बॉडीचं, ताकदीचं खूप कौतुक असतं. आपण किती बलवान आहोत हे दाखवण्यासाठी असे बॉडी बिल्डर तरुण वजनदार वस्तू उचलताना दिसतात. आपल्या ताकदीचं असं कौतुक वाटणाऱ्या एका तरुणाने तर चक्क म्हशीलाच (Buffalo) उचलण्याचा प्रयत्न केला (Boy trying to lift buffalo on shoulder).

म्हशीला (Buffalo Video)  उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे. तो म्हशीला उचलायला गेला आणि त्याची चांगलीच फजिती झाली (Funny video).

View this post on Instagram

A post shared by Kaint_soch (@kaint_soch4)

kaint_soch4 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला बिलकुल हसू आवरणार नाही.

हे वाचा - OMG! हेडलाइटमधून आगीच्या ज्वाळा सोडते ही कार; VIDEO पाहूनच हैराण व्हाल

व्हिडीओत पाहू शकता. तरुण सुरुवातीला उत्साहात आपली बॉडी दाखवताना दिसतो. आपले डोलेशोल दाखवतो. त्यानंतर एक्सरसाइझही करतो. त्यानंतर तो म्हशीला आपल्या खांद्यावर उचलायला जातो. खरंच हा तरुण म्हशीला खांद्यावर उचलतो की काय? असंच वाटतं. पण कसलं आहे. सुरुवातीला आपली भारी बॉडी दाखवणाऱ्या या तरुणाची फजिती होते. त्याच्याने म्हैस उचलणं दूर ती साधी जागेवरून हलतही नाही.

हे वाचा - बसणंही अशक्य एवढ्याशा कारमध्ये ड्रायव्हिंग; पठ्ठ्याने कशी केली कमाल पाहा VIDEO

जसं बाहुबली फिल्ममध्ये बाहुबलीने आपली ताकद दाखवली तशीच ताकद दाखवण्याच्या नादात तरुणाने स्वतःचं हसू करून घेतलं आहे. नेटिझन्सनी या तरुणाच्या कारनाम्याची चांगलीच मजा घेतली आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तरुणाला असं काही करताना पाहून कुणालाच हसू आवरलं नाही आहे. पुन्हा असा प्रयत्न करू नको, असा सल्लाही त्याला काही नेटिझन्सनी दिला आहे.

First published:

Tags: Funny video, Other animal, Pet animal, Viral, Viral videos