मराठी बातम्या /बातम्या /Viral /

...अन् Online scam करणाऱ्या भामट्याचीच तंतरली; महिलेचा रिप्लाय पाहून स्वतःच तिला ताबडतोब केलं ब्लॉक

...अन् Online scam करणाऱ्या भामट्याचीच तंतरली; महिलेचा रिप्लाय पाहून स्वतःच तिला ताबडतोब केलं ब्लॉक

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याला महिलेने असा धडा शिकवला की यापुढे तो तिच्याशी पंगा घेण्याची हिंमतच करणार नाही.

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याला महिलेने असा धडा शिकवला की यापुढे तो तिच्याशी पंगा घेण्याची हिंमतच करणार नाही.

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याला महिलेने असा धडा शिकवला की यापुढे तो तिच्याशी पंगा घेण्याची हिंमतच करणार नाही.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 02 जानेवारी: डिजीटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या (Online fraud) घटनाही वाढत आहेत. कित्येक लोकांनाआपण ऑनलाईन फसवणुकीचे (Online scam)  शिकार झालो आहोत हेसुद्धा समजत नाही. जेव्हा त्यांना समजतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्याचा काहीच फायदा होत नाही. मग पोलिसांकडे धाव घेतली जाते. पण एका महिलेने अशी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याला स्वतःच असा धडा शिकवला की यापुढे तो तिच्याशी पंगा घेण्याची हिंमतच करणार नाही (England woman gave savage reply to scammer).

ऑनलाइन फसवूणक करण्यासाठी स्कॅमर वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. ब्रिटनमध्ये लोकांची फसवणूक करणारे लोक व्हॉट्सअॅपवर कुटुंबातील एक सदस्य म्हणून मेसेज करतात (Britain whatsapp scam). असाच एक मेसेज लीड्सच्या जून मॉर्टन (June Morton) या महिलेला आला. एका व्यक्तीने तिचा मुलगा म्हणून तिच्या व्हॉट्सअॅपवर तिला मेसेज पाठवला (Scammer send message to woman on whatsapp).

हे वाचा - ऐकावं ते नवल! सोशल मीडियावर बटाट्याबाबत कमेंटमुळे वांदा; महिलेला FB ने केलं बॅन

जूनने याचा स्क्रिनशॉटही सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता एका अनोळख्या क्रमांकावरून मेसेज करण्यात आलेला आहे. मेसेजमध्ये म्हटलं आहे,  हेलो आई, मी आहे, हा माझा नंबर आहे. माझा आधीचा फोन काही वेळापूर्वी फुटला. त्यामुळे माझा आधीचा नंबर डिलीट कर आणि हा नंबर सेव्ह कर.

हा मेसेज वाचताच जूनला समजलं की हा खोटा मेसेज आहे. म्हणजे हा मेसेज तिला तिच्या मुलाने पाठवलेला नाही तर कुणी फ्रॉड व्यक्तीने पाठवला आहे. पण तिने अत्यंत हुशारीने काम केलं. तिने पोलिसात तक्रार केली नाही. तर तिने तिच्याच स्टाईलने त्या स्कॅमरला अद्दल घडवली. तिने त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला.

ती म्हणाली, हेलो बेटा, मला पुन्हा सांग तू कोण आहे. त्यावर त्या व्यक्तीचा मी तुमचा सर्वात मोठा आणि सर्वात प्रेमळ मुलगा आहे. मी माझा फोन दुरूस्त करायला एका दुकानात घेऊ आलो आहे. मला हा फोन तात्पुरता देण्यात आला आहे. मला माझा फोन पुढच्या मंगळवारी मिळेल. त्यावर महिलेने रिप्लाय दिला की, माझी चारही मुलं मोठी आहेत, त्यापैकी तू कोण आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, मी काही वेळापूर्वी सांगितल ना मी तुमचा सर्वात मोठा आणि प्रेमळ मुलगा.

हे वाचा - तुमची GF, बायको दिवस-रात्र गुगलवर काय शोधते माहिती आहे? इथं पाहा तिची सर्च लिस्ट

त्यानंतर महिलाने सांगितलं की तिची चारही मुलं एकत्र जन्माला आली. त्यानंतर मात्र ती व्यक्ती चांगलीच अडचणीत सापडली. महिलेने त्या व्यक्तीला नंतर दोन मेसेज केले पण समोरून तिला काहीच उत्तर मिळाल नाही. शेवटी तिने हेलो करून एक शेवटचा रिप्लाय पाठवला ज्यावर डबल क्लिक दिसलं नाही. म्हणजे तो मेसेज त्या व्यक्तीला गेला ना याचा अर्थ त्या व्यक्तीने स्वतःच त्या महिलेला ब्लॉक केलं होतं.

जूनने चार मुलांचा फोटोही पाठवला यापैकी तू कोण असंही विचारलं त्यावरही काही उत्तर मिळालं नाही. या फोटोतील मुलं जूनची आहेत की नाही माहिती नाही. पण तिने ज्या हुशारीने स्कॅमरला धडा शिकवला, त्याचं सर्वजण कौतुक करत आहेत.

First published:

Tags: Online crime, Online fraud, Savage reply, Scam, Viral, Whatsaap, World news