Home /News /crime /

बलात्कार करून पळाला पण कबाबच्या मोहामुळे अडकला जाळ्यात; भूकेनं पोहोचवलं गजाआड

बलात्कार करून पळाला पण कबाबच्या मोहामुळे अडकला जाळ्यात; भूकेनं पोहोचवलं गजाआड

महिलेनं हसनच्या आवडत्या फुटबॉल टीमबद्दल काहीतरी म्हटलं होतं, याच कारणामुळे तो भडकला आणि त्यांच्यात वाद झाला. बलात्कार करण्याआधी त्याने पीडितेला जबर मारहाण केली

  लंडन 01 फेब्रुवारी : बलात्कार प्रकरणातील एक आरोपी आपल्याच भूखेमुळे पकडला गेला. रेपिस्टने फूड डिलिव्हरी अॅपवरुन (Food Delivery App) कबाब ऑर्डर केलं आणि पोलिसांना त्याचं लोकेशन समजलं. यानंतर पोलिसांची टीम वेळ वाया न घालवता लगेचच घटनास्थळी दाखल झाली आणि आरोपीला पकडलं. जगात कदाचित हे पहिलंच असं प्रकरण असेल ज्यात फूड डिलिव्हरी अॅपमुळे एक आरोपी तुरुंगात पोहोचला (Police Arrested Rapist with Help of Food Delivery App). हुंडाबळीने देश हादरला! लग्नानंतर फ्रिज आणि बाईक दिली नाही, सुनेला जिवंत जाळलं! डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, आरोपी 43 वर्षीय डेनिअल हसन आणि पीडित महिला मागील वर्षी मे महिन्यात डेटिंग साईटवर (Dating Site) एकमेकांना भेटले. यानंतर पहिल्या डेटसाठी ते इंग्लंडच्या न्यूकॅसल सिटी सेंटरमध्ये भेटले. इथेच ठरलं की दोघं चॅम्पियन्स लीगची फायनल सोबत बघणार. हसन फायनल बघण्यासाठी महिलेच्या घरी पोहोचला. यादरम्यान त्याचा महिलेसोबत वाद झाला. यानंतर आरोपीने सुरुवातीला महिलेला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार करून फरार झाला. महिलेनं हसनच्या आवडत्या फुटबॉल टीमबद्दल काहीतरी म्हटलं होतं, याच कारणामुळे तो भडकला आणि त्यांच्यात वाद झाला. बलात्कार करण्याआधी त्याने पीडितेला जबर मारहाण केली. महिलेनं पोलिसांना सांगितलं की ती आरोपीला केवळ डॅनी नावाने ओळखते आणि तो मॅनचेस्टरचा रहिवासी आहे. या घटनेनंतर हसनने डेटिंग साईटच्या प्रोफाईलवरुन आपला फोटो काढून टाकला. मात्र, पोलीस हा फोटो रिकव्हर करण्यात यशस्वी ठरले.

  प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं अर्धा किलो सोनं; एअरपोर्टवर 1 तास बसवून ठेवल्यानंतर

  तपासात पोलिसांना समजलं की आरोपी Hauxley हा County Durham मध्ये कुठेतरी लपलेला आहे. मात्र, त्याचं नेमकं लोकेशन सापडत नव्हतं. पोलीस तपास करत असतानाच त्यांना एका फूड डिलिव्हरी अॅपवरून आरोपीच्या लोकेशनबद्दल माहिती मिळाली. हसनने आपल्यासाठी कबाब ऑर्डर केलं होतं. याच आधारे पोलीस त्याठिकाणी पोहोचले आणि त्याला पकडलं. ब्रिटिश पोलीस आरोपींना पकडण्यासाठी हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर करतात. यात या पद्धतीच्या अॅपची मदतही मिळते.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crime news, Rape case

  पुढील बातम्या