मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - एक फ्लिप आणि गटारातच झाला आडवा; स्टाइल मारता मारता तरुण तोंडावर पडला

VIDEO - एक फ्लिप आणि गटारातच झाला आडवा; स्टाइल मारता मारता तरुण तोंडावर पडला

आता स्टाइल मारण्याची हिंमत हा तरुण यापुढे कदाचित कधीच करणार नाही.

आता स्टाइल मारण्याची हिंमत हा तरुण यापुढे कदाचित कधीच करणार नाही.

आता स्टाइल मारण्याची हिंमत हा तरुण यापुढे कदाचित कधीच करणार नाही.

मुंबई, 09 जुलै : बहुतेक तरुणांना स्टंट (Stunt video) करण्याची, सर्वांसमोर आपली स्टाइल मारण्याची हौस असते. कधी कधी ही हौस उलटी पडते किंवा चांगलीच महागात पडते. सध्या अशाच तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल (Social media) होतो आहे. जो स्टाइल मारता मारता चक्क गटारात तोंडावर पडला आहे (Boy fell on face in drain while style). व्हिडीओ पाहून तुम्ही तुमचं हसू आवरू (Funny video) शकणार नाही.

काहीतरी वेगळं किंवा हटके कऱण्याच्या नादात बहुतेक लोक स्वतःच फसतात. आजूबाजूच्या लोकांना आपलं करतब दाखवायला जातात आणि स्वतःचीच फजिती करून घेतात. असंच या तरुणाने केलं.

व्हिडीओत पाहू शकता हा तरुण काही तरी करण्याच्या तयारी आहे. त्यांच्या शरीरात पूर्ण जोष दिसतो आहे. काही वेळातच तो समोरच्या दिशेनं धावत जातो आणि हात जमिनीला टेकवून उलटा होतो.

हे वाचा - 'मी इतकी सुंदर, हॉट पण एकही बॉयफ्रेंड पटेना', मॉडेलने मांडली आपली अजब व्यथा

डोकं खाली आणि पाय वर अशा अवस्थेत तो असतो पण त्याला त्याचा तोल सांभाळता येत नाही. म्हणून तो भिंतीचा आधार घ्यायला जातो. पण त्याचा तोल ढासळतोच आणि तो तिथंच खाली असलेल्या गटारात कोसळतो. त्याचं संपूर्ण तोंड त्या गटारात जातं आणि तो गटारातच आडवा होतो. त्यानंतर आजूबाजूचे लोक त्याला पाहून धावत येतात आणि ते त्याला गटारातून बाहेर काढतात.

व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसून येईल की कदाचित हा तरुण नशेत आहे. त्याला आधीपासूनच आपलं तोल सांभाळता येत नाही आहे. त्यात तो असा स्टंट करण्याचा प्रयत्न करतो, तेसुद्धा अशा विचित्र जागेवर आणि मग काय त्याचे परिणाम काय झाले ते तर तुम्ही पाहिलेच.  यापुढे तो नशेत काय शुद्धीवरही अशी स्टाइल मारण्याचा कदाचित प्रयत्न करणार नाही. असाच धडा या तरुणाला मिळाला आहे.

हे वाचा - लग्न राहिलं बाजूला, नवरा-नवरीने आधी जेवणावर मारला ताव; बकाबक खाताना VIDEO

तरुणसा ऑफिशियल  इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. बहुतेक नेटिझन्सनी यावर मजेशीर कमेंट दिल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Funny video, Stunt video, Viral, Viral videos