नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : सध्या आपण ज्या थंडीत राहत आहोत ती थंडीही आपल्याला सोसवेना झाली आहे. अंगावर कितीही कपडे चढवले तरी हुडहुडी भरतेच. अशा थंडीत कपड्यांशिवाय राहण्याचा कल्पनाही न केलेलीच बरी. पण अगदी तलाव गोठलं अशा थंडीत एका तरुणाने आपले कपडे काढले आणि थेट या तलावात उडी मारली (Man jumps in cold water). तसा धडकी भरवणारा हा व्हिडीओ आहे. पण त्यामागील कारण समजलं तर तुम्ही या तरुणाचं कौतुक कराल (Man jumps in ice lake water). गोठलेल्या तलावात कपड्याशिवाय उडी मारणाऱ्या तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ही व्यक्ती फक्त अंडरविअरवर आहे. अंगावरील सर्व कपडे तिने काढून टाकले आहेत. त्यानंतर ही व्यक्ती समोर असलेल्या तलावात उडी मारते. तलाव तुम्ही पाहिलं तर ते पूर्णपणे गोठलं आहे. तलावाच्या वरचा भाग बर्फासारखा गोठला आहे. आपण साधा बर्फ हातात घेतला तरी अगदी काही सेकंदही तो आपल्याला हातात धरवत नाही. मग विचार करा ही व्यक्ती या अशा पाण्यात कपडे न घालताच कशी राहिली असावी. तिला असं पाहून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. तरी ही व्यक्ती तशीच तलावाता पुढे जात राहते. सुरुवातीला ही व्यक्ती असं का करते आहे ते समजतच नाही. इतक्या थंडीतही कपडे काढून या अशा बर्फ बनललेल्या पाण्यात जाण्याची गरजच काय? ही व्यक्ती आपला जीव का धोक्यात घालते आहे, असंच तुम्हाला वाटेल. हे वाचा - OMG! बदकाचा असा VIDEO तुम्ही कधीच पाहिला नसेल; डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही ही व्यक्ती थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही समोर पाहू शकता एक कुत्रा तिथं दिसतो (Man jumps in cold water to save dog video). तो एका ठिकाणी पाहून भुंकत असतो. ही व्यक्ती त्या कुत्र्याच्या दिशेने जाते (Man saves Dog life). तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल जिथं पाहून हा कुत्रा भुंकत होता, तिथं एक कुत्रा पाण्यात पडला होता. त्याच्यावर या व्यक्तीची नजर गेली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने आपल्या अंगावरील कपडे गाठू या अशा थंडीतही या पाण्यात उडी मारली.
तसं कुत्र्यांना पाण्यात पोहोता येतं. पण या पाण्यावर बर्फ असल्याने बाहेर येण्यासाठी बर्फावर पाय ठेवतात पाण्यावरील बर्फ तुटत होता. त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. जसा हा तरुण पाण्यात गेला. तसा पाण्याचा पृष्ठभागावरील बर्फ बाजूला गेला आणि कुत्र्याचाही बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. त्या तरुणाच्या पुढे पुढे पोहोत कुत्रा बाहेर पडला आणि तरुणही बाहेर आला. हे वाचा - Video : फ्रिजमध्ये माणसाचं कापलेलं डोकं, दार उघडताच तरुणाची भयंकर अवस्था बाहेर येताच सर्वांनी त्या तरुणाचं टाळ्या वाजवत कौतुक केलं. त्याच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली. व्हायरल हॉग नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.