मुंबई, 29 नोव्हेंबर : एका अनोख्या शैलीत आईसक्रीम (Ice cream) देणाऱ्या आईसक्रीमवाल्यांचे बरेच व्हिडीओ (Ice cream video) तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील (Ice cream prank video). ज्यातून आईसक्रीम विक्रेते टर्किश स्टाइलने आईसक्रीम देत असतात. म्हणजे पहिल्यांदा दे आईसक्रीम देत नाही तर ग्राहकासोबत आधी मजा करताना दिसतात. याला प्रँक म्हणा, आपलं कौशल्य दाखवणं म्हणा किंवा ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा म्हणा. पाहताना खूप मजा येते. पण ज्या व्यक्तीला आईसक्रीम खाण्याची घाई आहे, त्यांना हे असे प्रँक बिलकुल आवडत नाही. त्यापैकीच एक म्हणजे लहान मुलं कारण त्यांना आईसक्रीमवाल्याच्या कौशल्याशी किंवा स्टाईलशी काही देणंघेणं नसतं. त्यांना खायची असते ती फक्त आईसक्रीम.
आईसक्रीम प्रँकचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आईसक्रीम प्रँकचे दोन असे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. ज्यात लहान मुलांसोबत आईसक्रीम विक्रेता प्रँक करताना दिसतो आहे. पण ही मुलंही काही कमी नाहीत. त्यांनीही आईसक्रीम प्रँक करणाऱ्या विक्रेत्याला चांगलाच धडा शिकवला. ज्यानंतर कदाचित ते यापुढे लहान मुलांसोबत असे प्रँक करताना आधी विचार करतील.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता एक छोटी मुलगी आईसक्रीम पार्लरजवळ उभी आहे, विक्रेता सुरुवातीला टर्किश शैली दाखवत आपलं करतब दाखवतो. तिच्यासोबत मजामस्ती करतो. शेवटी ही मुलगी आईसक्रीमवरून आपलं लक्ष हटवते आणि म्युझिकवर डान्स करू लागते. यानंतर नखरे दाखवणारा आईसक्रीवाला तिच्यासोबत डान्स करू लागतो.
हे वाचा - आजीनं नातीला दिली शिवी, मुलीच्या आईला आला संताप; अशी काढली भडास
आयएएस अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणखी त्रास द्या मुलांना, असं मजेशीर कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
और परेशान करो बच्चे को. pic.twitter.com/a394mquc8o
— Awanish Sharan (@AwanishSharan) November 26, 2021
या मुलीनं तरी शांतपणे सर्व परिस्थिती सांभाळून घेतली. पण एका मुलाला मात्र राग अनावर झाला. त्याने तर चक्क आईसक्रीमचा कोनच फोडून टाकला आहे. cute_baby_reel इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. पुन्हा मजा करू नका, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
हे वाचा - बेडवरुन उतरण्यासाठी चिमुकल्याचा अनोखा जुगाड; VIDEO पाहून वाटेल कौतुक
व्हिडीओत पाहू शकता जेव्हा मुलगा हातात आईसक्रीम घेतो तेव्हा आईसक्रीमवाला आपला हात मागे घेतो आणि मुलाच्या हातात फक्त आईसक्रीमचा कोनच राहतो. मुलाला इतका राग येतो की तो आईसक्रीमचा कोन जमिनीवर आपटतो आणि आपल्या पायाने चिरडून टाकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos