मराठी बातम्या /बातम्या /Viral /इच्छा तिथे मार्ग! बेडवरुन उतरण्यासाठी चिमुकल्याचा अनोखा जुगाड; VIDEO पाहून वाटेल कौतुक

इच्छा तिथे मार्ग! बेडवरुन उतरण्यासाठी चिमुकल्याचा अनोखा जुगाड; VIDEO पाहून वाटेल कौतुक

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नऊ ते दहा महिन्यांचं एक बाळ बेडवर बसलेलं आहे. अचानक त्याला बेडवरुन खाली उतरायची इच्छा होते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नऊ ते दहा महिन्यांचं एक बाळ बेडवर बसलेलं आहे. अचानक त्याला बेडवरुन खाली उतरायची इच्छा होते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नऊ ते दहा महिन्यांचं एक बाळ बेडवर बसलेलं आहे. अचानक त्याला बेडवरुन खाली उतरायची इच्छा होते.

नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) लहान मुलांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Baby) होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय क्यूट असतात तर काही व्हिडिओमध्ये लहान मुलांची मस्ती पाहण्यासारखी असते. तर अनेकदा मुलं असं काही करतात जे पाहून सगळेच हैराण होतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात लहान मुलानं ज्या पद्धतीने डोकं वापरलं ते पाहून नेटकरीही थक्क झाले.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नऊ ते दहा महिन्यांचं एक बाळ बेडवर बसलेलं आहे. अचानक त्याला बेडवरुन खाली उतरायची इच्छा होते. तो खाली उतरण्यासाठी बेडखाली बघतो. मात्र त्याला समजतं की कुठल्याही गोष्टीचा सहारा न घेता इथून उतरल्यास दुखापत होऊ शकते. यामुळे तो बेडची उंची पाहून आधीच उतरण्यासाठी बेडवरील इतर सामान खाली फेकू लागतो आणि अखेर अतिशय सावधगिरीने डोकं लावून खाली उतरतो.

हा हैराण करणारा व्हिडिओ आयपीएस रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. यासोबतच कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, प्रयत्न करणारे कधीच हारत नाहीत. एक रचना..! बातमी देईपर्यंत हजारोंनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी लाईकही केला आहे. याशिवाय अनेक यूजर्सनी या व्हिडिओमधील लहान मुलाचं कौतुक केलं आहे.

एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, खूपच सुंदर. अतिशय कठीण मात्र सरळ मार्ग बनवला. खूपच अवघड काम. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात इच्छा असे तिथे मार्ग दिसे. आणखी एकानं लिहिलं, खूप चांगला प्रयत्न. हे बाळ अतिशय हुशार आहे. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Viral video on social media