जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आजीनं नातीला दिली शिवी, मुलीच्या आईला आला संताप; अशी काढली भडास

आजीनं नातीला दिली शिवी, मुलीच्या आईला आला संताप; अशी काढली भडास

आजीनं नातीला दिली शिवी, मुलीच्या आईला आला संताप; अशी काढली भडास

आपल्या सासूनं मुलीला शिवी दिल्यामुळे संतापलेल्या (Grandmother cursed her granddaughter due to her naughtiness) सुनेनं सोशल मीडियावर सासूचा चांगलाच पाणउतारा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: आपल्या सासूनं मुलीला शिवी दिल्यामुळे संतापलेल्या (Grandmother cursed her granddaughter due to her naughtiness) सुनेनं सोशल मीडियावर सासूचा चांगलाच पाणउतारा केला आहे. आजी-आजोबा आणि नातवंडं यांचं एक वेगळंच नातं असतं. अनेकदा आईवडिलांपेक्षाही नातवंडांची गट्टी आजी आणि आजोबांसोबत (Relationship between grandmother and granddaughter) जमलेली दिसते. आईवडिलांच्या रागापासून मुलांना वाचवण्याचं कामही अनेक आजी आणि आजोबा करत असतात. त्यामुळे घरात आजी आजोबा असतील, तर पालक आपल्या मुलांना त्यांच्या जबाबदारीवर सोडून बिनधानस्त घराबाहेर पडू शकतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत आजीच्या जीवावर नातीला सोडून गेल्याचा पश्चात्ताप एका महिलेला झाल्याचं दिसलं. नेमकं काय घडलं? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका महिलेनं तिची कैफियत मांडली आहे. तिच्या म्हणण्यानुसार पाच महिन्यांपूर्वी तिला बाळ झालं. ती आणि तिचा पार्टनर या बाळासोबत आनंदात राहत होते. मात्र पाच महिन्यांनी त्यांना घराबाहेर पडण्याची गरज वाटू लागली. त्यासाठी त्यांनी डेटवर जाण्याचा प्लॅन केला. मात्र बाळाची जबाबदारी कुणावर सोपवायची, हा मोठाच प्रश्न होता. त्यासाठी त्यांनी महिलेच्या पार्टनरची बहीण आणि आई यांना घरी बोलावलं. त्यांनी बाळासोबत काही दिवस राहण्याची आणि त्याची काळजी घेण्याची तयारी दाखवली. या दोघींकडे बाळाला सोडून दोघं डेटवर निघून गेले. बाळ होतं खोडकर हे बाळ खूपच खोडकर असल्यामुळे काही दिवसांतच त्याची आजी वैतागली. मात्र आता बाळाची जबाबदारी घेतली असल्यामुळे तिने मुलगा आणि सून येईपर्यंत बाळाचा सांभाळ केला. ज्या दिवशी बाळाचे आईवडील घरी परतले, त्या दिवशी तिने बाळाला अशी काही शिवी दिली, की त्याच्या आईच्या डोक्यातच तिडीक गेली. हे वाचा - 89 वर्षांत कुणालाही जमलं नाही ते श्रेयसनं केलं, ‘हा’ रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय काय म्हणाली आजी? आपल्या बाळाच्या खोड्यांना वैतागलेल्या आजीने बाळाला त्याच्या आईवडिलांकडे सोपवलं. मात्र त्यावेळी बाळाला जोरदार शिवी दिली. एका जनावराशी त्याची तुलना करत दिलेली ही शिवी त्याच्या आईच्या जिव्हारी लागली. आपल्या पार्टनरनेदेखील ती शिवी ऐकली, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा महिलेनं केला आहे. पार्टनर या घटनेमुळे नाराज झाला होता, मात्र त्याने प्रत्यक्षात काहीच कृती न केल्याबद्दल महिलेनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर महिलेनं याबाबतची आपली भडास बाहेर काढत मन मोकळं केल. त्यावर युजर्सनी वेगवेगळे सल्ले आणि प्रतिक्रियादेखील दिल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात