मुंबई, 25 जानेवारी : मगरी चे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. ज्यात मगर सिंह, वाघ अशा प्राण्यांचीही शिकार करताना दिसते. पण कधी कोणत्या मगरीने कुणाला वाचवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असं शक्यच नाही. असंच तुम्ही म्हणाल. पण पाहूनही विश्वास बसणार नाही, असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. खतरनाक मगरीचं हळवं रूपही पाहायला मिळालं आहे. तुम्हाला माकड आणि मगरीची गोष्ट माहिती असेलच. ज्यात माकड मगरीच्या पाठीवरून बसून नदी पार करतं. पण या गोष्टीतही मगरीचा गोड गोड बोलून माकडाची शिकार करण्याचा डाव असतो. पण माकडाच्या हुशारीमुळे तो वाचतो. मग प्रत्यक्षात मगरीच्या जबड्यात माणूस लागला तर… पण या व्हिडीओत मात्र आपल्या कल्पनेपलीकडील घडलं. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हे वाचा - VIDEO - सिंहापासून वाचली पण…; म्हशीसोबत जे घडलं ते पाहून जंगलाचा राजाही हादरला आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात बुडालेल्या मुलाला पाठीवर ठेवून एक विशाल मगर दिसते. ती त्याला माणसांकडे सोपवते. इंडोनियामधील मगरी असलेल्या नदीत त्या कुटुंबाला आपला हा मुलगा सापडला नव्हता. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक मगर नदीतून किनाऱ्यावर येताना दिसते आहे. ती एकटी नाही तर तिच्या पाठीवर काहीतरी आहे. तुम्ही नीट पाहिलं तर तिच्या पाठीवर एक मुलगा आहे. आपल्या पाठीवर मुलाला ठेवून मगर नदीकिनाऱ्याजवळ येताना दिसते. एका बोटीजवळ ती पोहोचत पोहोचत येते. बोटीवरील लोक त्या मुलालाा उचलतात. त्यानंतर मगर तिथून लगेच माघारी फिरते. हे वाचा - कसं शक्य आहे? मगरीच्या जबड्यात जाऊनही तो जसाच्या तसा जिवंत बाहेर आला; Shocking Video फक्त 53 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणी याला अविश्वसनीय म्हटलं आहे तर कुणी चमत्कार. एका युझरने तर देव स्वत: या रूपात आल्याचं म्हटलं आहे.
Strange but true…
— Susanta Nanda (@susantananda3) January 24, 2023
A huge crocodile appears with the body of a drowned child on its back & hands it over. The family had failed to find it from a the crocodile infested river in Indonesia.
VC:Gulf Today pic.twitter.com/HDSuKezRSh
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.