जबरदस्त! डोळ्यांनी दिसत नसताना अंध तरुणानं केलं खतरनाक स्टंट, पाहा VIDEO

अंध तरुणानं हातात काठी घेऊन केलेला हा स्टंट पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

अंध तरुणानं हातात काठी घेऊन केलेला हा स्टंट पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

  • Share this:
    मुंबई, 12 जुलै : सोशल मीडियावर अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून हे खरे आहेत की नाही, असा प्रश्न पडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक अंध मुलगा हातात काठी घेऊन खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. हा मुलगा स्केटबोर्डवरून उडी मारत पायऱ्यांवरून खाली येतो. हे सगळं करत असताना तो चालाखीनं काठीचा वापर करतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा मुलगा अंध असल्याचा भासही होत आहे. व्हिडीओच्या शेवटी काही मुलं त्याचे कौतुक करतात. त्यावेळी तो थोडा चाचपडतो. काठीचा आधार घेऊन स्केटबोर्ड चालवणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या मुलाचे कौतुकही केले जात आहे. वाचा-अवघ्या 10 सेकंदात पाडलं जगातलं सर्वात मोठं स्टेडियम, पाहा थरारक LIVE VIDEO वाचा-बापरे! सायकलवरून तरुणानं हवेत मारली फ्लिप, VIDEO पाहून भरेल धडकी हा व्हायरल व्हिडीओ CCTV IDIOTS या ट्विटर युझरनं शेअर केला आहे. या व्हिडीओवर ट्विटर युझरनं आपण सतत कारणं देतो, असे म्हणत या मुलाचे कौतुक केले आहे. काहींनी तर, जेव्हा तुम्हाला वाटतं काही अशक्य आहे, तेव्हा अशी मुलं ते सगळं शक्य करून दाखवतात, असे म्हटले आहे. वाचा-खांबावर लटकून तरुणाचा खतरनाक स्टंट, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही लाखो लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला असून या व्हिडीओला 9 हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published: