लंडन, 9 मार्च : जगभरातील प्रसिद्ध खाद्य चेनने महिलांबाबत केलेल्या एका ट्वीटमुळे मोठा गदारोळ उठला आहे. सोशल मीडियावर या ब्रँडवर टीका केली जात आहे. महिला दिनाला महिलांविरोधात केलेल्या या ट्वीटमुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. बर्गर किंगच्या (Burger King) यूके ब्रांचने सोमवारी महिला दिनाला महिलांबाबत पूर्वग्रह ठेवणारं ट्वीट केलं होतं. यानंतर सोशल मीडियावर बर्गर किंगवर टीका केली जात होती. दरम्यान बर्गर किंगने याबाबत माफी मागणारं ट्वीट केलं आहे. बर्गर किंगने याआधीचं ट्वीट डिलिट केलं आहे. (Women’s place in the kitchen Citizens were outraged by Burger Kings remarks ) बर्गर किंगने रेस्तराँ इंडस्ट्रीमध्ये लैंगिंक असमानता दर्शवत खाण्यासंबंधित नवीन स्कॉलरशिप प्रोग्राम सुरू केलं आणि ट्वीट केलं की, महिलांची जागा स्वयंपाकघरात आहे. मात्र हे विधान लोकांना आवडल नाही आणि त्यांनी फास्टफूड चेनच्या ब्रिटनमधील शाखेने सोमवारी महिलांबाबत अपमानास्पद टिप्पणीबरोबरच एक लिंक शेअर केली होती. ब्रँड विरोधात टीका केली जात असल्यानं त्यांनी ट्वीट डिलिट केलं आहे. कंपनीच्या अमेरिकेतील शाखा बर्गर किंग फाउंडेशनने स्थानीय वृत्तपत्रात पानभरुन जाहिरात दिली आहे. यात ठळक अक्षरात लिहिलं होतं, ‘महिलाचं नातं किचनशी आहे. या जाहिरातीत पुढे लिहिलं होतं की, ‘फाइन डाइनिंग किचन, फूड ट्रक किचन्स, अवार्ड जिंकणारे किचन, कॅज्युअल डाइनिंग किचन असो वा बर्गर किंग किचन. मात्र तुम्हाला माहित आहे का की, सध्या स्वयंपारघरात कोणाचं राज्य असतं…? वास्तविक अमेरिकेत शेफ पदावंर केवळ 24 टक्के महिला आहेत. त्यातही महिला मुख्य शेफ पदावर असल्याचं प्रमाण केवळ 7 टक्के इतकं आहे.’ अशा प्रकारच्या कंटेन्टवरही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
We hear you. We got our initial tweet wrong and we’re sorry. Our aim was to draw attention to the fact that only 20% of professional chefs in UK kitchens are women and to help change that by awarding culinary scholarships. We will do better next time.
— Burger King (@BurgerKingUK) March 8, 2021
हे ही वाचा- ‘शाही परिवाराला मुलाच्या रंगाची चिंता होती,’ मेगन मर्केल यांचा आरोप! फास्टफूड चेनच्या ब्रिटिश शाखेने सोमवारी महिलाबाबत अपमानास्पद टिप्पणीबरोबरच एक लिंक शेअर केली होती. ब्रँडबद्दल टीका केली जात असल्यानं त्यांनी आपण केलेलं विधान चुकीचं असल्याचं सांगत ट्वीट हटवलं. न्यूयॉर्क टाइम्स (New York Times) मध्ये अशा जाहिरातींची किंमत 65 हजार डॉलरच्या जवळपास आहे. कंटेन्टवरही किंमत ठरवली जाते. न्यूयॉर्क टाइम्सने बर्गर किंगच्या जाहिरातीची किंमत सांगण्यास नकार दिला आहे.