नवी दिल्ली 08 जानेवारी : सध्या देशभरात लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात सोशल मीडियावर सतत लग्नसमारंभातील नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Videos) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ नवरी नवरदेवाचा डान्स पाहायला मिळतो, तर काही व्हिडिओ भावुक करणारे असतात. याशिवाय काही व्हिडिओमध्ये या जोडप्याचे नखरेही पाहायला मिळतात. सध्या असाच एक नवरीबाईचा व्हिडिओ (Viral Video of Bride) समोर आला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात नवरीबाई भरपूर नाराज दिसत आहे. नवरीबाईच्या नाराजीचं कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
VIDEO - 'जादुई' ब्लँकेट! हातात पडताच व्हिलचेअरवरील दिव्यांग व्यक्तीही चालू लागली
खरंतर ही नवरी आपल्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. मात्र, तिला आपला ड्रेस काही विशेष आवडलेला नाही. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की नवरीबाई गाडीमध्ये बसली आहे. ती आपल्या आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या हातामध्ये पुष्पगुच्छ दिसतो. मात्र ही नवरीबाई अतिशय़ नाराज आहे. तिचं नाराजीचं कारण इतर काहीही नसून तिचा ड्रेस आहे.
व्हिडिओमध्ये नवरी म्हणते, की माझा ड्रेस खूप वाईट आहे. खरंतर हा ड्रेस खूप छान आहे, मात्र यात मी काहीच करू शकत नाही. हा ड्रेस अतिशय जड आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ weddingsfever नावाच्या पेजवर पाहू शकता. व्हिडिओ आतापर्यंत 10 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. सोबतच हजारो लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, ग्रँड ड्रीम लेहंगा खरेदी केल्यानंतर प्रत्येक नवरीची अवस्था.
एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की ही नवरी अतिशय सुंदर आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, मॅडम जर तुम्हाला एवढा जड लेहंगा घालू वाटत नसेल तर तो खरेदी का करता. तिसऱ्याने लिहिलं, तुझा ड्रेस जड असेल, पण तू यात खूप सुंदर दिसत आहेस. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.