मुंबई, 17 सप्टेंबर : साप म्हटलं तरी धडकी भरते. त्यामुळे जंगल, पाणी अशा ठिकाणाहून चालताना सापांची भीती वाटते. पण जिथं आपण विचारही करणार नाही, अशा ठिकाणाहून साप बाहेर आला तर… तोसुद्धा खतरनाक विषारी किंग कोब्रा असेल तर… असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका स्कूटीतून कोब्रा साप बाहेर पडला आहे. एका स्कूटीत किंग कोब्रा लपून बसला होता. जगातील खतरनाक विषारी सापांपैकी एक. असा साप स्कूटीत असू शकतो, याचा आपण कधी स्वप्नातही विचार करू शकणार नाही. पण अशाच जागेतून हा साप निघाला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक स्कूटी दिसते आहे. एक व्यक्ती हातातील काठीने स्कूटीच्या हँडलवर मारते. हँडल काठीने फिरवते. त्यानंतर स्कूटीच्या हँडलजवळील समोरील भाग निघतो आणि त्यातून एक खतरनाक साप बाहेर येतो. हा साप कोब्रा आहे. हा साप स्कूटीच्या हँडलवर फणा काढून राहतो. हे वाचा - OMG! सापालाही फुटली शिंगं; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO सर्पमित्र कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो कुणाला हानी पोहोचवणार नाही. त्याचवेळी कोब्रा सर्पमित्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
Such guests during rains are common...
— Susanta Nanda (@susantananda3) September 7, 2021
But uncommon is the method used to rescue it. Never ever try this😟 pic.twitter.com/zS4h5tDBe8
कसंबसं करून बऱ्याच वेळेनंतर अखेर कोब्राला पकडण्यात यश येतं. तिथं असलेल्या नागरिकांनी स्नेक रेस्क्यूचं हे थरारक दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. अवघ्या2 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. पाहूनच अनेकांना घाम फुटला आहे. हे वाचा - बापरे! छाती ताणून सिंहांसोबत गप्पा मारायला गेला आणि…; तरुणाचं काय झालं पाहा VIDEO हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “पावसात असे पाहुणे दिसणं सामान्य आहे पण यांच्यापासून बचाव करण्याची ही पद्धत असामान्य आहे” असं सांगत असं कधीच करू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.