नवी दिल्ली, 21 जून : जोडीदाराने साथ सोडली तर त्याचं दुःख कुणालाच सहन होत नाही. फक्त माणसंच नव्हे तर मुक्या जीवांमध्येही तशीच भावना असते. असाच एक इमोशनल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका पक्ष्याचा मृत्यू झाला, त्याच्या जोडीदाराला हा धक्का सहन झाला नाही. काही सेकंदात त्याने त्याच्या मृतदेहावरच आपला जीव सोडला. पत्नीचा मृत्यू झाल्यावर पतीचा आणि पतीचा मृत्यू झाल्यावर पत्नीचा मृत्यू झाल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. जोडीदाराने कायमची साथ सोडली की एकटं आयुष्य जगण्याची इच्छाच उरत नाही. जोडीदाराच्या मृत्यूच्या धक्क्यात मृत्यू होतो. प्राणी-पक्ष्यांमध्येही असंच पाहायला मिळतं. पक्ष्याचा हा असाच व्हिडीओ. गायींना फक्त पाहूनच खतरनाक वाघाचीही हवा टाईट, शिकार सोडून ठोकली धूम; Watch Video एका पक्ष्याचा मृत्यू झाला. त्याच्या जोडीदाराने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण पक्षी काही हालचाल करत नव्हता, काही प्रतिक्रिया देत नव्हता. तिथं एक व्यक्ती त्या मृत पक्ष्याला खेचते. तसा तो जिवंत पक्षीही त्याच्यामागोमाग येतो. अखेर आपल्या जोडीदाराने आपली कायमची साथ सोडली, याची कल्पना त्या पक्ष्याला आली. जोडीदाराच्या मृत्यूचा धक्का त्याला सहन झाला नाही. त्याने त्याच्या मृतदेहावर आपलं डोकं ठेवलं आणि तिथंच उभ्या उभ्या जीव सोडला. बिबट्याला सूर्यनमस्कार घालताना पाहिलं आहे का? पाहा जागतिक योगदिनी खास व्हिडिओ तिथं असलेली व्यक्ती त्या पक्ष्याला हलवते. तर त्या पक्ष्यामध्येही काही हालचाल होत नाही. अखेर ती व्यक्ती त्या दोन्ही पक्ष्यांना हातात घेते आणि एका ठिकाणी त्यांना एकत्र मातीत पुरते.
Love & Loyality 💕💕
— Susanta Nanda (@susantananda3) June 21, 2023
If you have a heart, it will surely bleed at the end 😔😔 pic.twitter.com/FqnwThjOpi
भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावुक झाले आहेत. यावर बऱ्याच इमोशनल कमेंट येत आहेत.