जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाण्यात पक्षासोबत भिडला भलामोठा साप; दोघांच्या खतरनाक लढाईचा चकित करणारा शेवट..VIDEO

पाण्यात पक्षासोबत भिडला भलामोठा साप; दोघांच्या खतरनाक लढाईचा चकित करणारा शेवट..VIDEO

पाण्यात पक्षासोबत भिडला भलामोठा साप; दोघांच्या खतरनाक लढाईचा चकित करणारा शेवट..VIDEO

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तलाव दिसत आहे एक पक्षी दिसत आहे. अचानक एका मोठ्या सापाने त्या पक्ष्यावर हल्ला केला

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 09 मार्च : निसर्गाने प्रत्येक सजीवाला स्वतःच्या रक्षणासाठी काही ना काही खास गोष्ट दिली आहे, ज्याच्या मदतीने तो आपल्या शत्रूंना मारतोच आणि स्वतःचं रक्षणही करतो. काहींमध्ये उडण्याची ताकद आहे, काही विष सोडतात, काही वेगाने धावू शकतात. अशा प्रकारे जीव स्वतःचं रक्षण करतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की निसर्गात फक्त शिकार शिकारीला मारू शकते. पण आपल्या शक्तीचा वापर करून प्राणी कधी शिकारपासून शिकारी बनेल हे कोणी सांगू शकत नाही. नुकतंच हेच दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक पक्षी सापासोबत भिडताना आणि त्याला जखमी करताना दिसला. वाघ आला रे! जीव मुठीत धरून पळाले लोक, पण शेवटी दोघं…; भंडाऱ्याच्या शेतातील भयंकर दृश्य काही दिवसांपूर्वी @osmanuipon नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, जो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाण्यात पक्षी आणि साप यांच्यातील युद्ध दिसत आहे . पक्षी आणि साप यांच्या लढाईचा उल्लेख ऐकला तर तुमच्या मनात येईल की ही एकतर्फी लढाई असेल ज्यामध्ये साप जिंकेल, पण हे योग्य नाही. या व्हिडिओने ही बाब चुकीची सिद्ध केली आहे.

जाहिरात

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तलाव दिसत आहे एक पक्षी दिसत आहे. अचानक एका मोठ्या सापाने त्या पक्ष्यावर हल्ला केला. हा साप नीट दिसत नसला तरी त्याचा चेहरा आणि शरीर पाहता तो अजगर असल्याचं जाणवतं. अजगराची पकड खूप मजबूत असते. तो त्याच्या तावडीत असलेल्या कोणत्याही जीवाला दाबून मारतो. या व्हिडिओमध्ये अजगर तोंडाने पक्ष्याची पिसे पकडतो, मात्र पक्षी आपल्या धारदार चोचीने सापाच्या डोक्यावर वार करतो. व्हिडिओच्या शेवटी, जखमी पक्षी अतिशय संथ गतीने काठावर येताना दिसत आहे, सापाच्या तावडीतून त्याने स्वतःला वाचवलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

या व्हिडिओला 65 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने सापावर दगडफेक केली असावी, त्यामुळे सापाने पक्षाला सोडलं, असं अनेकांचं म्हणणं आहे. पण एका व्यक्तीने म्हटलं की, असं म्हणणाऱ्यांना हे समजत नाही की साप हा निसर्गाचा एक भाग आहे आणि त्याचं भक्ष्य शोधण्याचं काम तो करत आहे, हे अन्नचक्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात