जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वाघ आला रे! जीव मुठीत धरून पळाले लोक, पण शेवटी दोघं...; भंडाऱ्याच्या शेतातील भयंकर दृश्य

वाघ आला रे! जीव मुठीत धरून पळाले लोक, पण शेवटी दोघं...; भंडाऱ्याच्या शेतातील भयंकर दृश्य

भंडाऱ्यात शेतात घुसला वाघ.

भंडाऱ्यात शेतात घुसला वाघ.

भंडाऱ्यात महिनाभरापूर्वी एका वाघाला जेरबंद केल्यानंतर पुन्हा वाघ आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

  • -MIN READ Bhandara,Maharashtra
  • Last Updated :

भंडारा, 08 मार्च : भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात दोन महिन्यांपासून वाघा ची दहशत पसरली आहे. एक महिन्यापूर्वी वनविभागाने वाघाला जेरबंद करत जंगलात सोडले होते. मात्र पुन्हा एकदा वाघ धोप परिसरात आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गावात वाघाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. गावातील शेतात वाघ आल्याची माहिती होताच लोकांचा घोळका शेताकडे गेला. वाघ बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. लोकांच्या गोंधळाने वाघ सैरभैर झाला आणि सैरावरा पळू लागला. तो जवळच असलेल्या उमेश सपाटे यांच्या शेतात गेला. त्याला हुसकावून लावण्यासाठी नागरिक त्याच्या मागे धावू लागले. पॉवर ऑफ ‘आईची चप्पल’! शिकारीसाठी आलेली खतरनाक मगरही धूम ठोकून पळाली; पाहा VIDEO पळता पळता वाघ समोर आलेले शेतकरी पृथ्वीराज डहाकेच्या दिशेने वाघाने झेप घेतली. त्याच्यवेळी नागरिकांनी आरडाओरडा केला आणि वाघाने यू-टर्न घेतला. वाघाने तिथून ठोम ठोकली. जवळच असलेल्या नाल्याच्या दिशेने वाघ निघून गेला.

News18लोकमत
News18लोकमत

वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाची टिम वाघाला पकडण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. त्याचवेळी वाघाने एका वनकर्मचाऱ्यावर हल्ला केला. मदन हिरापुरे असं या कर्मचाऱ्याचं नाव. कान्द्री वनपरिक्षेत्रात ते कार्यरत आहेत. वाघाच्या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात

शेवटी वाघाने वनकर्मचारी आणि शेतकरी अशा दोघांवर हल्ला केला. वनकर्मचारी जखमी झाला. सुदैवाने शेतकरी थोडक्यात बचावला. त्यामुळे वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात