मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - ...अन् नवरीबाईला सोडून वहिनीकडे पळाला दीर; लग्नातच आऊट ऑफ कंट्रोल झाला नवरदेव

VIDEO - ...अन् नवरीबाईला सोडून वहिनीकडे पळाला दीर; लग्नातच आऊट ऑफ कंट्रोल झाला नवरदेव

दीर-वहिनीच्या या जोडीने लग्नात धिंगाणा घातला आहे.

दीर-वहिनीच्या या जोडीने लग्नात धिंगाणा घातला आहे.

दीर-वहिनीच्या या जोडीने लग्नात धिंगाणा घातला आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 30 ऑक्टोबर : लग्न (Wedding video) म्हणजे नवरा आणि नवरी (Bride and groom video) यांच्यात जुळत असलेलं एक बंध. हा क्षण फक्त त्या दोघांसह त्यांचे कुटुंब, नातेवाईकांसाठीही आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे तेसुद्धा याचा आनंद व्यक्त करताना दिसतात. असाच आनंद व्यक्त करणाऱ्यांपैकी एक म्हणजे नवरदेवाची वहिनी (Groom bhabhi video). जी दिरासाठी (Devar video) आई, बहीण, मैत्रीणही असते. दिराच्या (Brother in law) लग्नाचा (Devar wedding video) प्रत्येक कार्यक्रम, विधी-परंपरेत ती पुढाकार घेते. अशाच हौशी वहिनीने आपल्या दिराच्या (Dever bhabhi video) लग्नात असं काही केलं की अगदी दिरही इम्प्रेस झाला (Bhabhi dance in devar wedding). आपल्या लग्नात नवरीबाईला सोडून नवरदेव थेट वहिनीकडेच पळाला (Devar bhabi dance video). काही लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात लग्नामध्ये दिर आणि वहिनीची केमिस्ट्री पाहायला मिळते. वहिनी आणि दिराचं बाँडिंग किती घट्ट असतं हेच या व्हिडीओतून दिसून येतं. कारण जेव्हा वहिनी लग्नात डान्स करते तेव्हा दिराला मोह आवरत नाही आणि तो आपल्या नवरीला सोडून वहिनीसोबत ठेका धरायलाही मागेपुढे पाहत नाही. अशाच दीर-वहिनी जोडीच्या डान्सचा हा भन्नाट व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला स्टेजवर डान्स करताना दिसते आहे. ही महिला म्हणजे नवरदेवाची वहिनी आहे. सुरुवातीला ती स्टेजवर एकटीच डान्स करताना दिसते. पण तिला नाचताना पाहून दीरही आऊट ऑफ कंट्रोल होतो आणि तोसुद्धा स्टेजवर पळत येतो. आपल्या नवरीला एकटं सोडून तो वहिनीसोबत थिरकायला येतो. काही वेळाने त्याला नवरीची आठवण येते आणि तसा तो स्टेजवरून धावत जाऊन नवरीलासुद्धा स्टेजवर घेऊन येतो आणि मग तिघंही स्टेजवर धम्माल करताना दिसतात. रजत गुप्ता युट्यूब युझरने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे वाचा - VIDEO - 'हे काय आहे?', मित्राचा प्रताप पाहून भडकली नवरी; लग्नमंडपातच केला राडा असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात नवरा-नवरी दोघंही स्टेजवर उभे आहेत. नवरदेवाची वहिनी त्यांच्यासमोर येते आणि गाण्यावर ठुमके लगावताना दिसते. वहिनीला डान्स करताना पाहून नवऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंदही स्पष्ट दिसतो आहे. तो इतका उत्साहीत झाला आहे की वहिनी नाचत असताना तोसुद्धा हलताना दिसतो आहे. नंतर वहिनी त्याचा हात आपल्या हातात धरते आणि त्यालाही नाचायला लावतो. वहिनीसोबत दिरसुद्धा डान्स करताना दिसतो. khurafaati युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - आजीचा हटके जलवा! फक्त बोटांच्या जादूनेच 'सीधे दिले पे वार'; हा VIDEO एकदा पाहाच या दोन्ही व्हिडीओत बॉलिवूड फिल्ममधील गाणं लो चली मैं अपनी देवर की बारात लेके या गाण्यावर दीर-वहिनीचा हा डान्स पाहायला मिळतो आहे. दोन्ही व्हिडीओना नेटिझन्सची चांगलीत पसंती मिळाली आहे.
First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

पुढील बातम्या