मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - 'हे काय आहे?', वरमालावेळी मित्राचा प्रताप पाहून भडकली नवरी; लग्नमंडपातच केला राडा

VIDEO - 'हे काय आहे?', वरमालावेळी मित्राचा प्रताप पाहून भडकली नवरी; लग्नमंडपातच केला राडा

वरमाला विधी सुरू होताच मित्राने असं काही केलं ही पाहून नवरीबाईची सटकली.

वरमाला विधी सुरू होताच मित्राने असं काही केलं ही पाहून नवरीबाईची सटकली.

वरमाला विधी सुरू होताच मित्राने असं काही केलं ही पाहून नवरीबाईची सटकली.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 29 ऑक्टोबर : आपलं लग्न (Wedding video) अविस्मरणीय व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे परफेक्ट लग्नाची प्लॅनिंग खूप आधीपासून केली जाते. पण कितीही तयारी केली तर ऐन लग्नाच्या दिवशी काही ना काही घोळ होतोच किंवा नातेवाईक, पाहुणे, मित्र-मैत्रिणीही काही तरी गोंधळ घालतात आणि मग मनासारखं न झाल्याने किंवा मनाविरुद्ध झाल्याने नवरा-नवरीचा (Bride groom video) पारा चढतो. अशाच एका भडकलेल्या नवरीचा (Angry bride video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

नवरीबाईच्या मित्राने लग्नमंडपात सर्वांसमोरच असा प्रताप केला की नवरीबाईचा पारा चढला (Bride angry on friend). मित्राने जे केलं ते पाहून ते रागाने लालभडक झाली. लग्नातच तिने गोंधळ घातला. वरमालावेळीच मित्राचा प्रताप समजल्याने नवरीबाई इतकी संतप्त झाली की ती नवरदेवाला वरमालाही घालायला तयार नाही. वरमाला घालणं सोडून ती आपल्या मित्रालाच झापत राहिली.

View this post on Instagram

A post shared by _ (@weddding_bells)

व्हिडीओत पाहू शकता वरमाला विधी सुरू आहे. नवरा-नवरी एकमेकांसमोर वरमाला हातात घेऊन उभे आहेत. त्यांचे नातेवाईकही त्यांच्या आजूबाजूला आहे. अशात नवरीबाई कुणाला तरी शोधताना दिसते. अजू अजू करून ती हाक मारते. ती ज्याला शोधते तो नवऱ्याच्या मागच्या बाजूला थोडा दूर असतो. तो नजरेला पडताच नवरी भडकते.

हे वाचा - मेहुण्या शेर तर दाजी सव्वाशेर! नवरदेवाचे बूट पळवता पळवता फुटला घाम; पाहा Video

हा तरुण म्हणजे नवरीचा बेस्ट फ्रेंड आहे, हेच एकंदर दिसतं आहे. आपल्या खास क्षणी कुटुंबाप्रमाणेच आपला बेस्ट फ्रेंडही सोबत असावा असं वाटतं. या नवरीलाही तिचा बेस्ट फ्रेंड तिच्या सोबत हवा होता. त्यासाठी नवरदेवाला वरमाला घालण्याआधी ती त्या मित्राला शोधते. पण तो मित्र नवरदेवाच्या बाजूने उभा राहतो. त्यामुळे नवरीचा पारा चढतो. 'हे काय आहे, तू इकडे ये', असं ती मित्राला दटावताना दिसते.

हे वाचा - ऐन लग्नातच भडकली नवरी, नवरदेवाजवळ जायलाच तयार नाही; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

वेडिंग बेल्स इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आपल्या आयुष्यात सर्वांना अजू उर्फ अजय हवा असतो, कारण आपल्याला अशावेळी त्यांची साथ हवी असते, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video