हनिमूनच्या रात्री पतीने पत्नीला सांगितलं, 'मला स्त्री व्हायचंय!'; त्यानंतर जे काही झालं त्याची कल्पनाही करू शकत नाही

यानंतर जे काही झालं ते सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

यानंतर जे काही झालं ते सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Share this:
    सर्वसाधारणपणे मुलगा-मुलगी किंवा दोन मुली किंवा दोन मुलांचं लग्न पाहिलं असेल. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका तरुणाने किन्नरसोबत लग्न करून समाजात मोठा बदल घडवला आहे. त्या दोघांमध्ये प्रेम होतं. मात्र ब्रिटेनमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीला लग्नानंतर कळालं की, तिचा पती पुरुष नाही तर एक ट्रान्सजेंडर (Transgender) आहे. यानंतर जे काही झालं ते सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटेनमधील एक ग्राफिक डिजाइनरने अमेरिकेतील एका तरुणीसोबत प्रेम विवाह केला होता. जेव्हा दाम्पत्य हनिमूनला गेले तेव्हा पती ट्रान्सजेंडर असल्याचं समोर आलं. 33 वर्षींचा जेक आणि 30 वर्षांची जे हार्वीची पहिली भेट 2007 मध्ये एका वेबसाइटच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. 2017 मध्ये दोघांनी लग्न केलं. हे लग्न अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालं. सध्या ते दोघे ब्रिटेनमध्ये राहतात. हे ही वाचा-पावसात हेलिकॉप्टर शॉट मारताना खेळाडूचं थेट जमिनीवर लँडिंग, VIDEO VIRAL सेक्स बदलण्यासाठी केली शस्त्रक्रिया लग्नानंतर हनिमूनवर जेकने पत्नी हार्वीला सत्य सांगितलं. हार्वी म्हणाला की, तो नेहमीत एक महिला होऊ इच्छित होता. पत्नीला सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्याला खूप हलकं वाटत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. हार्वीने पती जेकला महिला होण्यासाठी मदत केली. जेकने सेक्स चेंज करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ज्यासाठी 45 हजार पाऊंड म्हणजे तब्बल 46 लाख रुपयांचा खर्ज आला. हार्वीने जेकला यासाठी संपूर्ण पाठिंबा दिला. ती स्वत: त्याचा मेकअप करीत असे आणि हळूहळू पत्नीने पतीला महिला होण्यासाठी सहकार्य केलं. जेंडर बदलल्यानंतर जेकला रायना असं नवीन नावही देण्यात आलं. दोन्ही महिला आता खूप खूश आहेत. आता पुन्हा एकदा दोघे सप्टेंबर महिन्यात लग्नाचा प्लान करीत आहेत. दोघांचे कुटुंबीयही या बदलामुळे खूप खूश आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published: