जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावरील साध्या मोचीची श्रीमंती पाहून सर्वजण थक्क; VIDEO तुफान VIRAL

रस्त्यावरील साध्या मोचीची श्रीमंती पाहून सर्वजण थक्क; VIDEO तुफान VIRAL

मोचीने असं काही केलं की होतंय कौतुक.

मोचीने असं काही केलं की होतंय कौतुक.

मोचीच्या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर : रस्त्यावर बसून चपला शिवून पैसे कमावणाऱ्या मोचीकडे फार फार तर किती पैसे असतील… त्याचं पोट भरेल इतकेच… अगदी प्रसिद्ध श्रीमंतांसारखी तो श्रीमंती तर गाठू शकत नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशा श्रीमंत मोचीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका रस्त्याशेजारी बसणाऱ्या मोचीच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जमिनीवर कागद, डोक्यावर एका खांबाला अडकवेली छत्री… अंगावर साधे कपडे. याला पाहून हा श्रीमंत असावा असं कुणीच म्हणणार नाही. तरी ही व्यक्ती श्रीमंत आहे. कारण त्याने जे केलं ते कित्येक श्रीमंतही करत नाही. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला ही व्यक्ती शांत बसलेली दिसते आहे. त्याच्या आसपास बरंच पाणी साचलं आहे. तिथंच त्याच्याजवळ त्याच्यापासून काही अंतरावर काही पक्षीही दिसत आहेत. ते या व्यक्तीकडे एकटक पाहत आहेत. या व्यक्तीसमोर एक पिशवी दिसते आहे. ही पिशवी उघडून ही व्यक्ती आपल्यासमोर ठेवते. त्यानंतर तिथं असलेले पक्षी तिथं येतात आणि त्यावर तुटून पडतात. हे वाचा -  Traffic जाममध्ये अडकला डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेला उशीर होतोय म्हणून उचललं असं पाऊल, आता Video होतोय व्हायरल गरीब व्यक्ती आपल्याच गरजा पूर्ण करू शकत नाही, एक वेळचं पोट भरणंही त्यांना मुश्किल तर ते दुसऱ्यांना काय देणार असं म्हटलं जातं. पण कुणाला काही देण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा पैसा असण्याचीच गरजच नाही. हे या व्हिडीओतून दिसून येतं. ज्या गरीबाकडे पैसा नसतो पण भूक असते. भूक लागते आणि खायला मिळत नाही तेव्हा काय होतं, हे यांना चांगलंच माहिती असतं. त्यामुळे कुणालाच ते उपाशी राहू देत नाहीत.

जाहिरात

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधीच आहे याची न्यूज 18 लोकमतला माहिती नाही. @md.ummarhussain इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा -  खारुताईसोबत घडली अशी गोष्ट, वाचून तुम्ही म्हणाल, ‘‘मला पण खारुताई व्हावसं वाटतंय’’ या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. रस्त्यावरील या  गरीब मोचीची श्रीमंती पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.  कुणीही व्यक्ती इतकी श्रीमंत कशी काय असू शकते? ही व्यक्ती मनाने श्रीमंत आहे, हा व्हिडीओ माणुसकीचं प्रतीक आहे, श्रीमंत लोकही कधी असं करत नाही, या व्यक्तीला खूप आशीर्वाद मिळतील. अशा बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात