लंडन, 26 फेब्रुवारी : काहीच काम न करता आपल्याला भरपूर पैसे मिळाले तर… असं स्वप्नं कित्येकांचं असतं. प्रत्यक्षात ते शक्य नाही. पण काही लोकांचं नशीब इतकं चांगलं असतं की काही क्षणात ते लोक मालामाल होता. असंच करोडपती होण्याची संधी चालून आली आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 10 कोटी रुपयांची रक्कमही तयार आहे. इतके कोटी रुपये मिळत आहेत. पण तरी ते घेण्यासाठी कुणीच पुढे येत नाही आहे. 10 कोटी रुपयांसाठी मालक शोधला जातो आहे. आता इतके पैसे मिळत असताना कोण बरं पुढे येणार नाही, इतकी रक्कम मिळत असूनही या पैशांना कुणीच मालक कसा सापडत नाही, नेमकं हे प्रकरण काय आहे, असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल. हे प्रकरण आहे यूकेतील. यूकेत 3 फेब्रुवारीला युरोमिलियन्स लॉटरीअंतर्गत 100 पेक्षा अधिक लोक करोडपती बनले. 4 लोकांनी मिळून जवळपास 10 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. ओ तेरी! आजीबाईने प्लॅस्टिक पिशवीतच शिजवलं अन्न; पण कसं पाहा VIDEO आश्चर्य म्हणजे लॉटरी जिंकल्याची माहिती या चारही विजेत्यांना नाही. चौघंही आपले जिंकलेले लॉटरीचे पैसे घेण्यासाठी आलेच नाहीत. त्यांच्याबाबत फार माहितीही मिळालेली नाही. आता या लोकांचा शोध घेतला जातो आहे. मेट्रोच्या रिपोर्टनुसार तीन लोकांनी रिटेल शॉपमधून आणि एकाने ऑनलाईन लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं.
या प्रकरणामुळे द नॅशनल लॉटरीशी संबंधित असलेले अँडी कार्टरही हैराण झाले आहेत. ते म्हणाले, विचार करा एखादी व्यक्ती करोडपती झाली पण याची माहितीच तिला नाही. आता एक आठवडला उलटला आहे. आतापर्यंत 27 विजेत्यांना लॉटरीची रक्कम देण्यात आली आहे. युरोमिलिन्स खेळणाऱ्या लोकांनी कृपया आपले अकाऊंट चेक करावेत. कदाचित 10 कोटींचं बक्षीस जिंकणारे ते चार लोक समोर येतील. आश्चर्य! डिलीव्हरीच्या 6 महिन्यांनी महिला पुन्हा प्रेग्नंट आणि जन्माला आले MoMo Babies ब्रिटमध्ये लॉटरी घेतल्यानंतर ड्रॉ निघाला की जिंकलेली रक्कम घेण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी असतो. आता या कालावधीत हे चौघंही पुढे येतात का? ही लॉटरी कुणी जिंकली असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे.