जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका किड्यानं खराब केलं संपूर्ण आयुष्य, 52 लाख खर्च करुनही कापावे लागले हात-पाय

एका किड्यानं खराब केलं संपूर्ण आयुष्य, 52 लाख खर्च करुनही कापावे लागले हात-पाय

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कीटकांच्या चाव्याव्दारे एखाद्याचा जीव धोक्यात येण्याची घटना अत्यंत दुर्मिळ असली तरी, अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यास कदाचित तुम्हाला देखील धक्का बसेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : कधी कधी एक छोटासा किटिकही आपलं जगणं कठीण करु शकतं. यासंबंधीत एक प्रकार व्यक्तीसोबत घडला. जो फारच विचित्र आणि धक्कादायक आहे. या व्यक्तीला एका छोट्याशा किटकाने थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. इतकच नाही तर त्या व्यक्तीचा एक हात आणि एक पायही कापावा लागला. जगात अनेक प्रकारचे कीटक आढळतात, त्यातील काही कीटक असे आहेत की चावल्यास ते थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचवतात. जरी असे धोकादायक कीटक सामान्यतः केवळ जंगली भागातच दिसतात, परंतु बरेच वेळा हे किडे उडून मानवी वस्तीपर्यंत पोहोचतात आणि नंतर रोग पसरवण्यास सुरवात करतात. कीटकांच्या चाव्याव्दारे एखाद्याचा जीव धोक्यात येण्याची घटना अत्यंत दुर्मिळ असली तरी, अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यास कदाचित तुम्हाला देखील धक्का बसेल. प्रकरण असे आहे की त्या व्यक्तीला एका छोट्या किटकाने चावा घेतला होता, परंतु त्यानंतर त्याच्या आयुष्यात असा भूकंप आला की तो मरण्यापासून थोडक्यात बचावला आहे. त्या किडीच्या चाव्यामुळे त्याला खूप गंभीर आजार झाला आणि नंतर त्याचे एक हात आणि एक पाय कापून शरीरापासून वेगळे करावे लागले. मायकेल कोहलहॉफ असे या व्यक्तीचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला टायफस नावाचा आजार आहे आणि हा आजार एका लहान परजीवी किड्याच्या चाव्याव्दारे माणसांमध्ये पसरतो. समस्या अशी आहे की हा आजार लवकर बरा होत नाही आणि लाखो, करोडो रुपये त्याच्या उपचारावर खर्च होतात. आता जरी या आजारावर उपचार केले जात असले, तरी शतकांपूर्वी यावर कोणताही इलाज नव्हता. असे म्हटले जाते की 1812 मध्ये अनेक फ्रेंच सैनिकांना हा आजार झाला होता आणि उपचाराअभावी त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. रिपोर्ट्सनुसार, मायकेलला सेप्टिक शॉकमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बरेच दिवस त्याच्यावर उपचार झाले, डॉक्टरांनी औषधे दिली, पण नंतर त्याचे हात पाय हळूहळू वितळू लागले. अशा परिस्थितीत डॉक्टरांना त्याचे हात पाय कापावे लागले, जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याच्या उपचारावर सुमारे 52 लाख रुपये खर्च झाले आहेत. त्‍याच्‍या कुटुंबाकडे तेवढे पैसे नसल्‍याने अशा परिस्थितीत त्‍यांनी निधीच्‍या माध्‍यमातून एवढा पैसा उभा केला आणि मायकलवर उपचार केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात