मुंबई 11 जानेवारी : एक असा रिसर्च समोर आला आहे, ज्यामध्ये सांगितलं जातं की थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणत चोरी होतात. यामागचं कारण आहे, ते म्हणजे या काळात लोक गाढ झोपेत असतात आणि गुलाबी थंडीत लोकांना चांगली झोप लागते, पण हाच काळ चोरांसाठी कामाचा असतो. तसेच लग्न घरात देखील चोरीचा चांगली संधी असते. त्यामुळे याच काळात चोर घरावर धाड घालतात.
बिलासपुरमधून अशीच चोरीची एक घटना समोर आली आहे. जिथे एका बिझनेसमॅनच्या रिसेप्शन पार्टीत दोन तरुणी पाहुणे म्हणून पोहोचल्या आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग चोरी करुन पळाल्या.
हे ही पाहा : महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि... पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक
पाहुण्यांच्या वेषात या तरुणी चोर होत्या हे काही लोकांना कळले नाही. पण नंतर जेव्हा चोरी झाल्याची घटना उघड झाली तेव्हा सीसीटीव्ही पाहाताच घरातील लोकांची पायाखालची जमीनत सरकली.
घडलेली सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली, ज्या लोकांना पाहूणे म्हणून पाहूणचार केला होता, त्यांनीच चोरी केली होती.
घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, सर्व पाहुणे पार्टीत वधू-वरांचे अभिनंदन करत होते. तेवढ्यात छान कपडे घातलेल्या दोन तरुणी हॉलमध्ये आल्या. दरम्यान, संधी पाहून एक मुलगी बॅग घेऊन स्टेजवर चढली आणि कोणाच्याही नकळत तेथून बॅग घेऊन पळाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लग्नमंडपातून बाहेर पडताना दोन महिलांसोबत एक तरुणही दिसत होता. हा तरुण देखील या सगळ्यात सामिल होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना कश्यप कॉलनीत राहणारा आकाश मलानी याच्या कार्यक्रमात घडली. ते प्लास्टिक-घरगुती वस्तूंचा व्यवसाय करतात. ही घटना ८ जानेवारीला रात्री 12 ते 12.45 च्या दरम्यान घडली.
अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, बॅगेत सोन्याच्या चार अंगठ्या, एक सोन्याची चेन, तीन चांदीची नाणी आणि दोन लाख रुपये रोख ठेवण्यात आले होते. या प्रकरणी सिरगीटी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Shocking, Theft, Viral, Wedding