जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दीड वर्षाचा मुलगा 15 मिनिट वॉशिंग मशिनमध्ये फिरत राहिला, आईच्या लक्षात आलं तेव्हा....

दीड वर्षाचा मुलगा 15 मिनिट वॉशिंग मशिनमध्ये फिरत राहिला, आईच्या लक्षात आलं तेव्हा....

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

दीड वर्षांच्या लहान मुलासोबत धक्कादायक प्रकार घडला, हा मुलगा वॉशिंगमशीनमध्ये साबण्याच्या पाण्यात पडून १५ मिनिटं फिरू लागला, आईच्या लक्षात आल्यानंतर… पुढे काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकार

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी : अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू माणसांचं काम हलकं किंवा कमी करण्यासाठी बनवले गेले आहे. पण ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वस्तु देखील कधीकधी माणसाठी धोक्याच्या होतात. यासंबंधीत तुम्ही अनेक गोष्टींबद्दल ऐकलं असेल. सध्या असंच एक प्रकरण दिल्लीमधून समोर आलं आहे. दीड वर्षांच्या लहान मुलासोबत धक्कादायक प्रकार घडला, हा मुलगा वॉशिंगमशीनमध्ये साबण्याच्या पाण्यात पडून १५ मिनिटं फिरू लागला. जेव्हा आईला मुलगा बराच काळ दिसला नाही, ज्यामुळे तिने शोधाशोध केली, तेव्हा तिला मुलगा वॉशिंगमशिनमध्ये कपड्यांसोबत फिरताना दिसला. तिने तसंच आपल्या मुलाला घेतलं आणि डॉक्टांकडे धाव घेतली. हे ही पाहा : हा गोठवणारा मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा, आधी फ्रिजरमध्ये बंद केलं मग…. आईने सांगितलं की, तिने वॉशिंगमशीनला कपडे लावले आणि ती दुसऱ्या रुममध्ये गेली, तेव्हा तिचा लहान मुलगा जवळच असलेल्या खुर्चीवर चढला आणि तेव्हाच त्याचा तोल जाऊन तो मशीवनमध्ये पडले. अखेर जवळ-जवळ १५ मिनिटांनी तिने शोधाशोध सुरु केली, तेव्हा तिला तिचं बाळ मशिनमध्ये फिरताना दिसलं. डॉक्टरांनी सांगितलं की, ‘‘जेव्हा महिलेनं बाळाला आणलं होतं, तेव्हा तो पूर्णपणे निळा पडला होता, त्याचा श्वास गुदमरला होता, साबणाचं पाणी त्याच्या नाकातोंडात गेलं होतं. पण नशिबाने आईला हे वेळेवर कळलं आणि ती आमच्यापर्यंत पोहोचली, ज्यामुळे आम्ही मुलाचा जीव वाचवू शकलो.’’ बाळ आता चांगलं झालं आहे आणि त्याला घरी देखील पाठवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, परंतु हे बाळ सात दिवस कोमा आणि वेंटिंलेटरवर होतं, त्यानंतर त्याला १२ दिवस वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. जेव्हा ते बाळ ठणठणीत बरं झालं, तेव्हा त्याला घरी सोडण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नशिबाने या बाळाचे प्राण वाचले आहे. पण तुमच्या घरी देखील एखादं बाळ असेल, तर काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर मुलं संकटात येऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात