मुंबई १४ नोव्हेंबर : सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे. एकदा का येथे आपण आलो की येथे माहिती पाहाण्यात किंवा व्हिडीओ पाहाण्यात आपला वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्याला कळत नाही. पण खरोखरंच येथील व्हिडीओ हे फारच मनोरंजक असतात. जे आपला दिवसभराचा थकवा घालवतात. तर काही व्हिडीओ हे आपल्यासाठी एक शिकवण किंवा उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. हा व्हिडओ वाईल्ड लाईफ संबंधीत आहे. पण यामध्ये जे काही घडलं ते सगळ्यांसाठी एक शिकवण देखील आहे. हे ही पाहा : नशेत मच्छिमाराने गळ्यात गुंडाळला अजगर, पुढे जे घडलं ते… पाहा Video आपल्याला तर हे माहित आहे की वाघ किंवा सिंह हे जंगलातील सगळ्यात तरबेज प्राणी आहेत. त्यामुळे यांच्या हातात एकदा का एखादा शिकारी लागला की त्याच्या वाचण्याची शक्यता नाहीच. कारण ते इतक्या हुशारीने आणि आपल्या तल्लख बुद्धीने शिकार करतात की त्यांची बरोबरी केलीच जाऊ शकत नाही. पण असं असलं तरी देखील या व्हिडीओतील वाघासोबत या उलटच घडलं. हा वाघ हरणाला पाहातो, ज्यानंतर तो अत्यंत हुशारीने आणि दबक्या पावलाने हरणाजवळ जातो. तो हरणाच्या जवळ जाऊन दबक्या पावलानं तेथेच थांबतो आणि योग्य संधीची वाट पाहात असतो. पण तितक्यात हे हरीण वाघाला पाहातं आणि तेथून पळ काढतं.
हे सगळं इतक्या पटापट होतं की वाघाला याचा थांगपत्ताच लागत नाही आणि त्याच्या नाका खालून हरीण पळून जातो आणि तो आपली शिकार गमावतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाघाची किव येईल आणि त्याच्यासाठी बिचारा…. असं म्हणावसं वाटेल.
पण हे लक्षात घ्या की जर तरबेज शिकारी असलेल्या वाघासोबत जर असा प्रकार घडू शकतो. तर आपल्या सारख्या लोकांच्या बाबतीत हे घडणं अगदी सामान्य आहे. त्यामुळे काही गोष्टी हातात आल्या नाही किंवा गाठता आल्या नाहीत, तरी देखील खचून जाऊ नका. आयुष्यात पुढे जात रहा, यश नक्की हाती लागेल.