वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर : एका बाळाला जन्म देणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही. आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका असतो. त्यामुळेच रुग्णालयात प्रसूती करण्यावर जोर दिला जातो. पण सध्या डिलीव्हरीचं असं प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. वडिलांनी स्वतःच आपल्या बाळाची डिलीव्हरी केली आहे आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्याने जे केलं ते धक्कादायक आहे. ते पाहून बाळाची आईही हादरली. रिक्षा, कार, ट्रेन, विमानात महिलेची डिलीव्हरी झाल्याची काही प्रकरणं आपल्याला माहिती आहेत. अशीच अचानक डिलीव्हरी वेळ आली ती अमेरिकेतील एका महिलेवर. हायववेरच तिची डिलीव्हरी करावी लागली. त्यावेळी तिच्या नवऱ्याने तिची डिलीव्हरी करण्याचा प्रयत्न केला . इंडियानातील 12 सप्टेंबरची ही घटना आहे. हायवेवर बाळाला जन्म देणाऱ्या महिलेने स्वतःच ही संपूर्ण घटना आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने आपल्या डिलीव्हरीच्या विचित्र अनुभवाची फेसबुक पोस्ट केली आहे. हे वाचा - घर, हॉस्पिटलऐवजी महिलेने महासागराच्या कुशीत दिला बाळाला जन्म; हैराण करणारं कारण स्टफन वाडेल त्याची प्रेग्नंट बायको एमिलीला घेऊन रुग्णालयात जात होता. पण रुग्णालयापर्यंत पोहोचणं अशक्य असल्याचं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे स्टिफनने हायवेवरच गाडी थांबवली.
तीन मुलांची आई असलेली एमिली म्हणाले, रस्त्यातच मला बाळ बाहेर येत आहे, असं जाणवू लागलं. मी ओरडली आणि थोड्या वेळातच डिलीव्हरी झाली. पण त्यानंतर जे झालं ते भयानक होतं. स्टिफनने आयफोन चार्जरने बाळाची गर्भनाळ बांधली. त्यानंतर मी लगेच ब्रेस्टफिडिंग सुरू केलं.
पूर्ण डिलीव्हरीत ती आपली बहीण आणि डिलीव्हरी नर्ससोबत फोनवर बोलत होती आणि अॅम्बुलन्सची वाट पाहत होते. बहिणीला यावर विश्वासच बसत नव्हता. तिला सर्व मस्करी वाटत होती, असंही ती म्हणाली. हे वाचा - Shocking! शाळेत जायला निघालेल्या मुलीच्या पायांमध्ये लटकत होतं डोकं; आईसमोर आलं धक्कादायक सत्य आता आई आणि बाळ दोघंही स्वस्थ असल्याची माहिती आहे. तिच्या मुलीचं नाव रिगन असं आहे.