मानागुआ, 02 जून : पूर्वी घरीच प्रेग्नंट महिलांची डिलीव्हरी केली जायची. पण त्यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका असतो. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीतच प्रसूती करावी असा सल्ला दिला जातो. तरी काही परिस्थितीत अचानक रस्त्यात, रेल्वेत, विमानातही डिलीव्हरी झाल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असेल. पण कधी समुद्रात डिलीव्हरी झाल्याचं ऐकलं आहे का? एका महिलेने आपल्या बाळाला महासागराच्या कुशीत जन्म दिला आहे (Pregnant woman delivery in ocean). समुद्रात बाळाचा जन्म म्हणजे तुम्हाला वाटेल असेल की जसं विमानात प्रवास करताना अचानक डिलीव्हरी होते तशी जोसीची समुद्रात बोटीने किंवा जहाजाने प्रवास करताना झाली असावी तर असं बिलकुल नाही. 27 वर्षांच्या जोसी प्युकर्टने मुद्दामहून आपल्या डिलीव्हरीसाठी महासागर निवडला. खास समुद्रात डिलीव्हरी करायची म्हणून जर्मनीहून ती मध्य अमेरिकेत आली. फेब्रुवारी 2022 ला तिने नायकारगुआमध्ये प्रशांत महासागरात आपल्या मुलाला जन्म दिला (Baby birth in ocean). ज्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. ते आता पुन्हा व्हायरल झाले आहेत. हे वाचा - आश्चर्य! महिनाभरातच दोनदा Pregnant झाली महिला; चमत्कारिक Pregnancy बाबत डॉक्टर म्हणाले… जोसीचं हे चौथं मूल. तिची पहिली डिलीव्हरी रुग्णालयात. दुसरी कुटुंबाने घरीच केली, तिसरी आयाच्या मदतीने घरीच झाली. चौथी डिलीव्हरी तिला फ्री म्हणजे डॉक्टर किंवा इतर कुणाच्याही मदतीशिवाय मोकळ्या आणि नैसर्गिक वातावरणात करायची होती. तिला आपल्या प्रसूतीत दुसऱ्या कोणाचीच दखल नको होती. त्यामुळे तिने मुलाच्या जन्माची तारीख, वेळ, स्कॅन हे काहीच केलं नाही. फक्त निसर्गाच्या घंट्याची प्रतीक्षा केली. जशा वेदना सुरू झाल्या तसं तिने आवश्यक सामान घेतलं आणि थेट प्रशांत महासागर गाठलं. न्यूयॉर्क टाइम्स च्या रिपोर्टनुसार आपल्या या विचित्र डिलीव्हरीच्या अनुभवांबाबत सांगताना ती म्हणाली, “प्रसूती वेदनावेळी समुद्राच्या लाटांनी मदत केली. जशा लाटा शरीरावर पडायच्या वेगळाच अनुभव मिळायचा. पूर्णपणे सुरक्षित वाटत होतं. मूल जन्माला येताच मऊ वाळूला स्पर्श करेल ज्यामुळे त्याला एक वेगळं समाधान मिळेल, याची कल्पना मला होती” डिलीव्हरीवेळी तिच्यासोबत फक्त तिचा नवरा तिच्यासोबत होता. ज्याने बाळाच्या जन्मानंतर प्लेसेंटा पकडून काढण्यात मदत केली. त्याने गर्भनाळ हातानेच खेचून काढली. आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहे. हे वाचा - शरीराने जोडलेल्या जुळ्या लेकींना पाहून बसला धक्का! काळजावर दगड ठेवून पालकांनी पोटच्या गोळ्यावर फिरवला ‘चाकू’ निसर्गाच्या देणगीला तिने नैसर्गिक पद्धतीने, नैसर्गिक वातावरणात या जगात आणलं. समुद्राच्या कुशीत बसून, लाटांच्या स्पर्शात एका बाळाला जन्म दिला. काही नेटिझन्सनी जोसीच्या हिमतीला दाद देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी बाळाबाबत केलेल्या बेजबाजबादरापणाबाबत ट्रोलही केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







