'मै टकलू हो जाऊंगा' चिमुकल्याचा केस कापतानाचा क्यूट व्हिडीओ पुन्हा VIRAL
‘अरे क्या कर रहे हो? पूरे बाल काट दोगे क्या ?’ असं म्हणणाऱ्या चिमुकल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याच मुलाचा आणखी एक व्हिडीओ त्याच्या वडिलांनी शेअर केला आहे.
नवी दिल्ली, 27 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच काही ना काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाचा केस कापतानाचा (Hair Cutting) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये केस कापण्यासाठी बसवलेल्या मुलाला केस कापून घ्यायचे नाहीत. तो मोठ्या मोठ्याने ओरडून ‘अरे क्या कर रहे हो? पूरे बाल काट दोगे क्या ?’ असं म्हणत होता. जुना व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याच मुलाचा आणखी एक व्हिडीओ त्याच्या वडिलांनी शेअर केला आहे.
खरंतर लहान मुलांना सलुनमध्ये केस कापायला नेणे म्हणजे पालकांसाठी खूप मोठं काम असते. या व्हायरल व्हिडीओतही असाच काही प्रकार पहायला मिळतो आहे. या मुलाचे वडील अनुप यांनी आपल्या ट्विटर (Twitter) अकाउंटवर हा दुसरा व्हिडीओ अपलोड केला असून यातही हा लहान मुलगा न्हाव्याशी गप्पा मारताना त्याला उत्तरं देताना दिसतो आहे. यामध्ये न्हावी त्याला आपको कैसा लाग रहा है, मैं आपकी कटिंग कर करा हू? यावर छोटा अनुश्रुत (Anushrut) नही अच्छा नही लग रहा है, असे उत्तर देतो. यानंतर काही काळाने न्हावी त्याला वाघ कसा आवाज करतो असे विचारतो. यावर तो वाघाचा आवाज काढतो. तसेच हा जंगली प्राणी आवाज काढत नाही तर डरकाळी फोडतो असंही तो म्हणतो.
इंटरनेटवर या व्हायरल व्हिडीओतील अनुश्रुत आणि न्हाव्याच्या संभाषण लोकांच्या पसंतीस पडत आहे. यानंतर शांत झाल्यावर त्याने कितीवेळ हे केस कापले जाणार आहेत असं न्हाव्याला विचारलं. त्यावर त्याने टकलू हो जाऊंगा असं म्हटलंय. 22 जानेवारीला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर त्यावर अनेक लाईक कमेंट्स येत आहेत.