मराठी बातम्या /बातम्या /Viral /ऐकावं ते नवल! चक्क समोशाने केली इंजिनीअरिंग; B.Tech डिग्रीवाला समोसा चर्चेत

ऐकावं ते नवल! चक्क समोशाने केली इंजिनीअरिंग; B.Tech डिग्रीवाला समोसा चर्चेत

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

इंजिनीअरिंग केलेला समोसा सध्या चर्चेत आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

अखंड प्रताप सिंह/लखनऊ, 29 जानेवारी : थंडी म्हटलं की गरमागरम वडापाव, भजी आणि समोसा हे पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. तुम्हीही समोसा आवडीने खात असाल. प्रत्येक ठिकाणच्या समोशाची चवही वेगवेगळी असते. काही विशिष्ट ठिकाणचा समोस खायला तुम्हाला आवडत असेल. पण तुम्ही कधी डिग्रीवाला समोसा खाल्ला आहे का? हो बरोबर वाचलंत... डिग्रीवाला समोसा. ही डिग्रीही साधीसुधी नाही तर इंजिनीअरिंगची. हो समोशाने चक्क इंजिनीअरिंग डिग्री केल आहे... काय फक्त वाचूनच आश्चर्य वाटलं नाही. समोशाने इंजिनीअरिंग केली म्हणजे काय? हा काय प्रकार आहे? चला पाहुयात.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये हा इंजिनीअरिंग समोसा तुम्हाला खायला मिळेल. कानपूरमध्ये राहणाऱ्या अभिषेक कुमारने हा समोसा तयार केला आहे. अभिषेक कुमार ज्याने 2020 साली राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून बीटेक केलं आहे. त्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरी केली. पण नोकरीत त्याचं मन लागत नव्हतं. कोरोना काळात सर्वकाही बंद होतं. तेव्हा काहीतरी वेगळं आणि मोठं असं करण्याचा विचार त्याने केला. स्टार्टअपचा निर्णय घेतला. त्यावर बराच अभ्यास करून त्याने फूडलाइनमध्ये जाण्याचं ठरवलं. त्यात असा एक खास पदार्थ जो प्रत्येक ठिकाणी मिळतो, त्यावर विचार केला आणि हा पदार्थ म्हणजे समोसा.समोसा अगदी गल्लीपासून मॉलपर्यंत सर्व ठिकाणी मिळतो. त्याची इंजिनीअरिंग केली तर... असा अभिषेकने विचार केला.

हे वाचा - पराठ्याच्या नावाने काहीही! VIDEO पाहून सांगा, आहे का असं काही खाण्याची तुमची तयारी?

अभिषेक म्हणाला, इंजिनीअर केल्यानंतर स्टार्टअप म्हणून इंजिनीअर समोसा बनवायला सुरूवात केली.  2021 साली कानपूरच्या काकादेवमध्ये दुकान उघडलं. जशा इंजिनीअरिंगमध्ये वेगवेगळ्या ब्रांच असतात तशा प्रत्येक प्रकारच्या इंजिनीअरिंग ब्रांचचा वेगवेगळा समोसा इथं मिळतो. लोकांना हा समोसा खूप आवडतो. दुकानात जेव्हा कुणी इंजिनीअर येतो, तेव्हा त्याला तो आपलासा वाटतो.

समोशाच्या व्हरायटीबाबत म्हणायचं तर इथं चॉकलेट समोसा, मोमोज समोसा, पनीर समोसा, पास्ता समोसा, मंचुरिअन समोसा असे बऱ्याच प्रकारचे समोसे मिळतात.  10 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत समोसे उपलब्ध आहे.  गोड आणि हिरव्या तिखट चटणीसोबत हे समोसे सर्व्ह केले जातात.  पण या समोशाची आणखी एक खासियत म्हणजे याच्यासोबत आईस्क्रिमही मिळतं. हो बरोबर समोशासोबत आईस्क्रिम तुम्ही कधीच खाल्लं नसेल पण हे एक इंजिनीअरच करू शकतो. इंजिनीअरिंग समोसा तुम्हाला आईस्क्रिमकसोबत दिला जातो, ज्यामुळे तो इतर समोशांपेक्षा वेगळा आणि खास आहे.

हे वाचा - Video: वडापावच्या मुंबईत पहिल्यांदाच भरलाय 'येडा पाव' फेस्टिव्हल, 40 प्रकारची आहे मेजवानी

अभिषेक स्वतः हे समोसे बनवतो. त्यातील स्टफिंगपासून ते तळण्यापर्यंत सर्वकाही तोच करतो. या दुकानात लोक आपल्याला फक्त इंजिनीअर म्हणूनच हाक मारतात. नोकरी करून जे समाधान मिळालं नाही ते समाधान इथं मिळतं, असं तो सांगतो. इंजिनीअर समोशाने फक्त देशात नाही तर जगात ओळख मिळवून दिली. प्रत्येक देशात आपलं आऊटलेट खोलण्याची इच्छा आहे. देशाबाहेरही ब्रांच सुरू करायची आहे. असं स्वप्न त्याचं आहे.

First published:

Tags: Food, Uttar pradesh, Viral