मुंबई, 29 जानेवारी : मुंबई म्हंटलं की डोळ्यासमोर मुंबईचा प्रसिध्द वडापाव येतो. मुंबईतल्या खाऊ गल्लीमध्ये वडापावसह अनेक वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये 'येडा पाव' फूड फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंय. हा फेस्टिव्हल नावाप्रमाणेच हटके असून खवय्यांसाठी चांगलीच मेजवानी आहे.
काय आहे खास?
दादर मधील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दोन दिवसीय फूड फेस्टिवल चा आयोजन करण्यात आलेला आहे. मिरची लाईट या संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केलंय. आत्तापर्यंत मुंबईकरांनी मिसळ महोत्सव, आगरी कोळी महोत्सव अनेकदा पाहिले. पण, शहरात पहिल्यांदाच फक्त पावाशी संबंधित असा हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलाय. यामध्ये वडापाव, शॉर्मा पाव, खिमा पाव, पिझ्झा, केक, मिसळ पाव असे पावाचे 40 हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. खिशाला परवडणारे असे पदार्थ एकाच छताखाली खाण्यासाठी मोठी गर्दी होतीय.
मित्राचा ऐकला सल्ला आणि कोल्हापूरकरांना मिळाला 'लय भारी' पदार्थ, Video
या दोन दिवसांच्या फेस्टिव्हलमध्ये लहान मुलांसाठी पाककला स्पर्धा ठेवण्यात आली असून त्याचबरोबर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम देखील पाहायला मिळणार आहेत. वरुण इनामदार, वीणा प्रभू, तुषार प्रीती देशमुख असे पाककलेच्या दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलीय.
मालवणी महोत्सव किंवा मिसळ महोत्सव याची सर्वांना सवय झालेली आहे. मुंबईकरांना वेगळा अनुभव यावा, त्यांच्या जिभेला वेगळी चव मिळावी, यासाठी हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आल्याची माहिती, आयोजक विक्रांत आचरेकर यांनी दिली. दाखवावं तसेच एक वेगळी चव जिभेला मिळावी यासाठी या संस्थेने या फूड फेस्टिवल चा आयोजन केल आहे. 'मिर्ची लाईट' ही तीन मैत्रिणींनी मिळून सुरू केलेल्या व्यवसायाला आता एक वर्ष झालंय. येडापाव महोत्सवाचं आमचं स्वप्न या निमित्तानं पूर्ण होतंय, अशी भावना आयोजक रुना दबडे यांनी व्यक्त केली.
'पाव ही जागतिक संकल्पना आहे. जगभरातला याला वेगवेगळी नावं आहेत. या फेस्टिव्हलमध्ये 40 ते 45 वेगवेगळे स्टॉल्स आहेत. सेल्फी पॉईंट हा येथील खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर इथं अनेक स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलय. पाककला स्पर्धा, संगीत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त जणांनी भेट द्यावी,' असं आवाहन शालिनी माणगावकर यांनी केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Local18 food, Mumbai