नवी दिल्ली 05 डिसेंबर : 3 वर्षांपूर्वी जगभरात कोरोना व्हायरस नावाची एक धोकादायक महामारी आली, ज्याने लाखो लोकांचा जीव घेतला. आता जगातील जवळपास सर्वच देश या आजारापासून मुक्त झाले आहेत आणि लोक आपलं जीवन सामान्यपणे जगू लागले आहेत. मात्र, ज्या देशापासून या रोगाची सुरुवात झाली होती, तिथे आजही हा आजार कहर करतो आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत आणि तिथले लोक सरकारने घातलेल्या निर्बंधांना विरोध करत आहेत.
मृत्यू तुम्हाला कसा शोधून काढेल याचा काही नेम नाही... हा Video पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल
चीनमध्ये एका कोरोनाग्रस्त व्यक्तीने क्वारंटाईनसाठी जाण्यास नकार दिल्यावर अधिकाऱ्यांनी त्याला ओढत आपल्यासोबत नेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, या व्यक्तीला त्याचं घर सोडायचं नव्हतं. परंतु प्राधिकरणाकडून त्याला जबरदस्तीने नेलं जात होतं. या घटनेचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे.
A man was dragged out of his home in China after allegedly refusing to go to a quarantine facility. Authorities said they later apologized for "pulling and dragging" him. https://t.co/WiOA9AQSSA pic.twitter.com/TjM68WViLO
— CNN (@CNN) December 2, 2022
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती त्याच्या घराच्या सोफ्यावर बसला आहे आणि दोन लोक त्याला जबरदस्तीने तिथून घेऊन जात आहेत. या लोकांना या व्यक्तीला कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी चीनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये घेऊन जायचं आहे. परंतु ही व्यक्ती तेथे जाण्यास तयार नाही. एका व्यक्तीला ओढत नेत असल्याचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे़
साई बाबांच्या चरणी डोकं टेकवलं अन् उठलाच नाही; भक्ताचा हृदयद्रावक शेवट, Shocking Video
@CNN च्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अधिकारी आणि रुग्णाचा संघर्ष पाहता येतो. हा व्हिडिओ ३ डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 2 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले असून लोकांनी त्यावर विविध प्रकारे कमेंटही केल्या आहेत. त्याबद्दल त्या व्यक्तीची नंतर माफीही मागितल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.