मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Shocking! काहीही खाल्लं की तोंडातून येतो घोड्याच्या पळण्याचा आवाज; विचित्र समस्येमुळे तरुणी हैराण

Shocking! काहीही खाल्लं की तोंडातून येतो घोड्याच्या पळण्याचा आवाज; विचित्र समस्येमुळे तरुणी हैराण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

तरुणीसोबत घडलेल्या एका दुर्घटनेनंतर तिला या विचित्र समस्येचा सामना करावा लागतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 15 मार्च : तुम्ही अशाच बऱ्याच लोकांना पाहिलं असेल ज्यांच्या तोंडातून खाताना आवाज येतो (sounds while eating). खाताना तोंडाचा आवाज करू नये, असं आपल्याला मोठी माणसंही सांगतात. पण तरी काहींना त्याची सवयच झालेली असते. त्यामुळे ती सुटणं जवळपास अशक्यच. सामान्यपण चावताना कसा आवाज येतो तो आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका महिलेच्या तोंडातून खाताना चक्क घोडा चालावा असा आवाज येतो (Woman sound like galloping horse while eating). चेल्सी रॉबेसन (Chelsey Raubeson) असं या तरुणीचं नाव आहे. ती सहावीत होती, तेव्हा तिच्यासोबत एक दुर्घटना घडली आणि तेव्हापासून तिला खाताना तोंडातून आवाज येण्याची समस्या उद्भवली. तेव्हा ती एकदा खेळत होती आणि अचानक एक किकबॉल तिच्या चेहऱ्यावर बसला. बॉल तिच्या चेहऱ्यावर इतक्या जोरात आदळला की तिचा जबडाच हलला (Woman jaws dislocate makes weird sound while eating). हे वाचा - पैसे जमवून लोकांनी उभारला आपला नवा 'देश'; तुम्हीही होऊ शकता नागरिक कसं ते पाहा आता जबड्याला मार लागून तो हलल्यानंतर साहजिकच आपण डॉक्टरांकडे जाऊ. पण चेल्सीने तसं बिलकुल केलं नाही. जसा तिच्या चेहऱ्यावर बॉल लागून तिचा जबडा हलला तसं तिने लगेच आपल्या चेहऱ्यावर जोरात मुक्का मारला आणि जबडा पुन्हा आपल्या जागी आणला.  यानंतर तिचा जबडा तर जागेवर आला पण तिला ही विचित्र समस्या जाणवू लागली. तिचे जबडे एकमेकांवर घासू लागले आणि जेव्हा ती काहीही खाते तेव्हा तिच्या तोंडातून घोड्याच्या चालण्यासारखा विचित्र आवाज येतो. या आवाजावर ती काही केल्या कंट्रोल करू शकत नाही. हे वाचा - उडी मारताच ...; हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही बंजी जम्पिंगचा विचारही करणार नाही डेली स्टारच्या रिपोर्टनुसार चेल्सीने आपला एक व्हिडीओ आपल्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात तिने आपल्या या समस्येबाबत सांगितलं आहे.  चेल्सी सांगते, ती खाऊपिऊ शकते, पण जेव्हा की पिझ्झा, नॉनव्हेज असे कठीण पदार्थ खाते तेव्हा तिला वेदना होतात. शिवाय डेटिंगवेळी खूप अडचण येते. जेव्हा ती कुणासोबतही डेटिंगवर जाते तेव्हा खाताना असा आवाज आल्याने अनेकदा रिलेशनशिप सुरू होण्याआधीच संपते. ही समस्या तिने याआधी डॉक्टरांना दाखवली नाही, म्हणून तिला डॉक्टरांकडे जायची भीती वाटते.
First published:

Tags: Health, Lifestyle, Viral

पुढील बातम्या