मुंबई 31 ऑगस्ट : आपल्या देशात जुगाडू लोकांची कमी नाही. सोशल मीडियावर देखील आपल्याला देसी जुगाड व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आश्चर्यचकित करणारे असतात आणि हे देखील तितकच खरं आहे की, भारतीय लोकांचा जुगाडमध्ये कोणीही हात पकडू शकत नाही. कारण ते उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये गरजेची वस्तु तयार करतात. म्हणूनच तर त्यांनी देसी जुगाडू म्हणतात. सध्या सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ देखील असाच आहे. जो पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल. आता हेच पाहा ना. बाईकवर नियमांनुसार फक्त दोनच लोक प्रवास करु शकतात. जास्तीत जास्त 3 लोक बसवून त्यावरुन नेतात. परंतु या व्हिडीओमध्ये एका बाईकवर चक्कं 7 लोक बसले आहेत. हो… हे सात लोक एका बाईकवरुन प्रवास करत आहेत. फक्त दोन लोक बसु शकणाऱ्या बाईकवर या लोकांनी 7 जणांसाठी कशी काय जागा केली, हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. हे वाचा : रिक्षा चालकाकडून शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ, पाहा Viral Video व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहे. तो स्वत: दुचाकीसोबत उभा असून खाली २ महिला आणि त्यांच्यासोबत ४ मुले आहेत. एकूण 7 जण एकाच बाईकवर बसतात, जणू काही एक अख्खं कुटुंबच त्यामध्ये सामावलेलं आहे.
Speechless 😶 pic.twitter.com/O86UZTn4at
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) August 30, 2022
यातरुणाने दोन मुलांना पुढे इंधनाच्या टाकीवर बसवलं आहे. आणि मग स्वत: चालक बसला, त्याच्यामागे एक महिला आणि एक मूल तिच्या मांडीवर बसलं, तर शेवटी आणखी एक महिला बसली आणि तिच्या मांडिवर देखील एक लहान मुलं आहे. हे वाचा : त्याची बाईक रेल्वे ट्रॅकमध्ये अडकली आणि समोरुन ट्रेन आली… घटनेचा थरारक Video व्हायरल हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर supriyasahuias नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे - हे लोक स्वत:चं जीव धोक्यात टाकत आहेत. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. दुसरीकडे, दुसर्या युजरने कमेंट करताना लिहिले आहे- थोडीशी चूक झाली तर या मुलांचे काय होईल? याचा विचार या व्यक्तीने करायला हवा.