वॉशिंग्टन 22 नोव्हेंबर : अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमध्ये रविवारी संध्याकाळी एक गाडी ख्रिसमस परेडमध्ये शिरली. गाडीच्या धडकेत अनेकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत (Multiple Deaths after SUV Plows into Christmas Parade). अधिकारी वाउकेशाच्या मिलवॉकीमध्ये घडलेल्या या घटनेचा तपास करत आहेत. ही घटना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. यावेळी याठिकाणी लोक वार्षिक समारंभ पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते.
पोलीस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी पत्रकारांना सांगितलं की "नाताळच्या परेडमध्ये लाल रंगाची एसयूव्ही घुसली. यावेळी कारने काही मुलांसह २० हून अधिक लोकांना धडक दिली. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी मृत्यू झालेल्या लोकांची संख्या सांगितली नाही. ते म्हणाले, की जोपर्यंत मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली जात नाही तोपर्यंत कोणतीही अधिक माहिती उघड करणार नाही. अग्निशमन प्रमुख स्टीव्हन हॉवर्ड म्हणाले की, 12 मुलांसह 23 जणांना सहा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून अधिकाऱ्यांनी वाहन जप्त केले आहे. कार थांबवण्यासाठी एका अधिकाऱ्याने त्या गाडीवर गोळीबारही केल्याचे प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे सोमवारी इथली शाळा आणि रस्ताही बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं.
Graphic video shows a speeding vehicle ram through participants of the Christmas parade in #Waukesha, Wisc. Few details confirmed at this point though the police said they have a person of interest they’re looking into. pic.twitter.com/zKEX1VoC2T
— Andy Ngô 🏳️🌈 (@MrAndyNgo) November 22, 2021
विस्कॉन्सिन राज्य कोषाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अँजेलिटो टेनोरिओ देखील परेडमध्ये होते आणि त्यांनी मिलवॉकी जर्नल सेंटिनेलला सांगितले की आम्ही एक एसयूव्ही जवळून जाताना पाहिली. नंतर आम्हाला मोठा आवाज ऐकू आला. ते म्हणाले की, यानंतर केवळ लोकांच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागले. या लोकांना या वाहनाने धडक दिली होती.
पोलिसांनी सांगितलं की, अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जर्नल सेंटिनेलने अहवाल दिला की फुटेजमध्ये एसयूव्ही शाळेच्या मार्चिंग बँडच्या मागून परेडमध्ये वेगाने जात असल्याचे दिसून आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking video viral